रुग्ण आढळणाऱ्या इमारती, चाळी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून पालिकेकडून जाहीर केली जातात. दहापेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील केली जाते. पालिकेने 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यास सुरूवात केली. त्यानंतर मुंबईतील कोरोनाचा फैलाव आटोक्यात आल्याचं दिसून आलं. घरोघरी तपासणी, सर्वेक्षण, जनजागृती आणि प्रभावी उपाययोजनांमुळे इमारतींमधील रुग्णसंख्या घटत आहे. त्यामुळे सील केलेल्या इमारतींची संख्याही कमी झाली आहे.
पालिकेन रोज होणाऱ्या चाचण्यांची संख्या वाढवली आहे. आधी रोज सात हजार चाचण्या होत होत्या. आता १५ ते १८ हजार चाचण्या रोज केल्या जात आहेत. ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईत एकूण चाचण्यांची संख्या १५ लाख १३ हजार १५४ झाली आहे.
मुंबईतील ४३ हजार इमारती टाळेबंदीतून मुक्त
मध्य व पश्चिम मार्गावरील लोकल फेऱ्यांमध्ये वाढ