Advertisement

मुंबईतील ४३ हजार इमारती टाळेबंदीतून मुक्त

रुग्णांची संख्या घटू लागल्याने मुंबईतील अनेक इमारती या आठवड्यात लॉकडाऊनमधून मुक्त करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील ४३ हजार इमारती टाळेबंदीतून मुक्त
SHARES

मुंबईत कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव काहीसा कमी होताना दिसत आहे. मागील अनेक दिवसांपासून रुग्ण वाढीच्या कालावधीत मोठी वाढ झाल्यानं अनेकांना दिलासा मिळाला आहे. रुग्णांची संख्या घटू लागल्याने मुंबईतील अनेक इमारती या आठवड्यात लॉकडाऊनमधून (lockdown) मुक्त करण्यात आल्या आहेत. तसंच, कोरोनातून बरे होणाऱ्यांचं वाढते प्रमाण, मृत्यूचा घसरता दर आणि दिवसेंदिवस होणारी रुग्णघट यामुळं मुंबईसह राज्यात सध्या दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. 

मुंबईतील रुग्ण कोरोनामुक्त (covid 19) होण्याचं प्रमाण शनिवारी ८८ टक्क्यांवर पोहोचले, तर रुग्णवाढीचे प्रमाण ०.४२ टक्क्यांवर घसरले. मुंबईत शुक्रवारी १,१४५ नवे रुग्ण सापडले होते, मात्र शनिवारी त्यांत घट होऊन ९९३ रुग्णांची नोंद झाली. शुक्रवार आणि शनिवारची मृतांची संख्या मात्र सारखीच, ३२ आहे. राज्यातही गेल्या काही महिन्यांतील सर्वात कमी, ७४ बळींची नोंद शनिवारी झाली, तर रुग्णांचा आकडाही शुक्रवारच्या ६,१९० वरून ५,५४८ एवढा खाली घसरला.

मुंबईत कोरोनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत ५१ हजाराहून अधिक इमारती सील करण्यात आल्या होत्या. रुग्णसंख्येतील घसरणीबरोबर मुंबईतील हजारो सील इमारतींच्या संख्येतही घट झाली आहे. आतापर्यंत ४३,५८३ इमारती लॉकडाऊनमधून मुक्त झाल्या असून सध्या केवळ ७,४५७ इमारतीच टाळेबंदीत आहेत.

मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर पालिकेने रुग्ण सापडलेली ठिकाणे प्रतिबंधित करण्यास सुरुवात केली. मात्र एखाददुसरा रुग्ण सापडल्यानंतर संपूर्ण इमारत सील करण्यात येत असल्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजी पसरू लागली. त्यामुळे रुग्णांची संख्या आणि परिस्थिती लक्षात घेऊन इमारत पूर्णत: अथवा अंशत: सील करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा