Advertisement

मध्य व पश्चिम मार्गावरील लोकल फेऱ्यांमध्ये वाढ

सर्वासाठी लोकल प्रवासाची विनंती राज्य सरकारने रेल्वेला केली आहे. त्यावरून सध्या चर्चा सुरू असली तरी, त्याच्याच तयारीचा भाग म्हणून रेल्वेने लोकल फेऱ्या वाढवण्यास सुरुवात केल्याचे समजतं.

मध्य व पश्चिम मार्गावरील लोकल फेऱ्यांमध्ये वाढ
SHARES

अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे १ नोव्हेंबरपासून लोकल (mumbai local) फेऱ्यांमध्ये आणखी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ६१० फेऱ्यांची भर पडणार असून एकूण २०२० फेऱ्या धावत असल्याची माहिती मध्य व पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.

मध्य रेल्वेवरील (central railway) सध्याच्या ७०६ फेऱ्यांत आणखी ३१४, तर पश्चिम रेल्वेवरील (western railway) ७०४ फेऱ्यांमध्ये २९६ फेऱ्यांची भर पडली आहे. त्यामुळं या दोन्ही मार्गावर मिळून एकूण २०२० फेऱ्या धावत आहेत. सर्वासाठी लोकल प्रवासाची विनंती राज्य सरकारने रेल्वेला केली आहे. त्यावरून सध्या चर्चा सुरू असली तरी, त्याच्याच तयारीचा भाग म्हणून रेल्वेने लोकल फेऱ्या वाढवण्यास सुरुवात केल्याचे समजतं.

मुंबईत लॉकडाऊनपूर्वी दोन्ही मार्गावर ३,१४१ लोकल फेऱ्या धावत होत्या. येत्या आठवड्यात सामान्यांसाठी लोकलचा निर्णय होताच सर्व फेऱ्या पूर्ववत होणार असल्याचंही रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं. पश्चिम रेल्वेवर २९६ फेऱ्या वाढणार आहेत. यामधील ७६ फेऱ्या सकाळी गर्दीच्या वेळी आणि ५१ फेऱ्या संध्याकाळी गर्दीच्या वेळी धावत आहेत. 

सध्या ६ महिला विशेष लोकल फेऱ्यांत आणखी ४ फेऱ्या, तर एसी लोकलच्या १० फेऱ्यात २ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. या वाढीव फेऱ्यांत सर्वाधिक ६५ फेऱ्या विरार-अंधेरीदरम्यान, ४३ फेऱ्या विरार ते बोरिवलीदरम्यान आणि ४२ फेऱ्या बोरिवली ते चर्चगेट दरम्यान धावत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा