सीरम इन्स्टिट्यूटनं कोविशिल्डचे दर कमी केले, आता इतक्या किंमतीत लस मिळणार

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (serum institute)नं बुधवारी कोव्हिशिल्ड (Covishiled) लसीच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली. त्यानुसार राज्य सरकारसाठी प्रती डोसची किंमत ३०० रुपये निश्चित केली आहे. यापूर्वी राज्य सरकारला (state Government) ४०० रुपयात लस देणार अशी घोषणा केली होती.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अदान पूनावाला यांनी ट्विट केलं की, "सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं दिलेल्या लसीची किंमत प्रति डोस ४०० रुपयांवरून ३०० रुपयांपर्यंत कमी करणार आणि हे तत्काळ अंमलात आणलं जाईल. यामुळे राज्याची हजारो कोटी रुपयांची बचत होईल.''

तथापि, सीरमनं कोविशिल्डच्या (Covishiled) एका डोसची किंमत केवळ राज्य सरकारसाठी कमी केली आहे. खासगी रुग्णालयांना अद्याप कोविशिल्ट लसीचा डोस केवळ ६०० रुपयांना मिळेल. केंद्रानं सीरम आणि भारत बायोटेकला किंमत कमी करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत हे दर कमी करण्यात आले.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की कोरोना लसीच्या किंमतींवरून झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सीरम संस्था आणि भारत बायोटेक यांना त्यांच्या लसीची किंमत कमी करण्यास सांगितले होते. पीटीआयने सरकारी स्रोतांचा हवाला देत म्हटलं आहे की, सरकारनं दोन्ही कंपन्यांना किंमत कमी करण्यास सांगितलं आहे.


हेही वाचा

“महाराष्ट्रात लाॅकडाऊन वाढवायलाच हवा”

दिलासादायक! मुंबईच्या 'या' भागातील रुग्णसंख्येत लक्षणीय घट

पुढील बातमी
इतर बातम्या