Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

“महाराष्ट्रात लाॅकडाऊन वाढवायलाच हवा”

मंत्रिमंडळ बैठकीत लाॅकडाऊनवर निर्णय होण्याची शक्यता आहे. बहुतांश मंत्र्यांचं मत महाराष्ट्रातलं लाॅकडाऊन वाढवण्यात यावं या बाजूचंच असल्याने त्यावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.

“महाराष्ट्रात लाॅकडाऊन वाढवायलाच हवा”
SHARES

महाराष्ट्रातील लाॅकडाऊनचा कालावधी संपायला २ दिवस उरलेले असताना हे लाॅकडाऊन पुढं वाढवण्यात यावं की नाही यावर सर्वसामान्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. त्यातच बुधवारची मंत्रिमंडळाची बैठक होत असल्याने या बैठकीत लाॅकडाऊनवर निर्णय होण्याची शक्यता आहे. बहुतांश मंत्र्यांचं मत महाराष्ट्रातलं लाॅकडाऊन वाढवण्यात यावं या बाजूचंच असल्याने त्यावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील कोरोना विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने १ मे पर्यंत राज्यात कडक लॉकडाऊन लागू केलेला आहे. या लाॅकडाऊन अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. भाजीपाला, खाद्यपदार्थांच्या दुकानांना सकाळी ७ ते ११ अशी केवळ ४ तासच सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. सार्वजनिक वाहनांतून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. तातडीच्या वैद्यकीय कारणांशिवाय सर्वसामान्यांना जिल्हाबंदीही करण्यात आलेली आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. असे हे कडक निर्बंध १ मे सायंकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत.

या कडक निर्बंधांनंतरही राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आलेली नाही. बेड्स, आॅक्सिजन, औषधांचा तुटवडा अजूनही जाणवतच आहे. त्यातच १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांनाच लसीकरणास परवानगी देण्यात आल्याने लसीकरणासाठी मोठी गर्दी उसळ्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व मुद्द्यांवर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- दिलासादायक! मुंबईच्या 'या' भागातील रुग्णसंख्येत लक्षणीय घट

यासंदर्भात वृत्तवाहिनीशी बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात लॉकडाऊन वाढवण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. लॉकडाऊन कोणालाही आवडत नाही. माझाही लाॅकडाऊनला पहिल्यापासून विरोध आहे. पण राज्यातील आरोग्य सुविधांवर कमालीचा ताण आलेला आहे. रोज हजारोंच्या संख्येने कोरोनाबाधित रुग्णालयांत दाखल होऊ लागले, तर आपली आराेग्ययंत्रणा कोलमडून पडू शकते. ती वेळ येऊ द्यायची नसेल, तर टाेक गाठण्याआधीच आपल्याला परिस्थिती नियंत्रणात आणावी लागेल. त्यासाठी आणखी रुग्ण वाढणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे, म्हणूनच लाॅकडाऊन वाढला पाहिजे, असं मला वाटतं असं भुजबळांनी सांगितलं.

एकट्या नाशिक जिल्ह्यात १९ एप्रिलला ६८०० असणारी रुग्णसंख्या गेल्या २ दिवसात ३६०० वर आली आहे. रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली आहे. ज्या नाशिक जिल्ह्यातून १५ आमदार निवडून येतात तिथं ही परिस्थिती आहे. तर इतर जिल्ह्यांची अवस्था काय असेल. लाॅकडाऊन काढलं तर जनता पुन्हा मोठ्या संख्येने रस्त्यावर येऊन कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे लाॅकडाऊन पुढं वाढवणं अपरिहार्य असल्याचं छगन भुजबळ म्हणाले.

(lockdown must have continued in maharashtra says chhagan bhujbal)


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा