Advertisement

कोरोना प्रतिबंधक लस घेणं का गरजेचं आहे?

लस घेताना ती का घ्यायला हवी हे बहुतेकांना माहित नसतं. आज जाणून घेऊयात की कोरोना प्रतिबंधक लस घेणं का गरजेचं आहे.

कोरोना प्रतिबंधक लस घेणं का गरजेचं आहे?
SHARES

देशात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं वेग घेतला आहे. १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांना देखील कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. यासाठी आज (बुधवार) पासून नोंदणी प्रक्रियेला देखील सुरुवात झाली आहे.

सुरुवातीला लस ही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिली गेली. त्यानंतर टप्प्या टप्प्यानं ६० वर्षावरील नागरिकांना आणि मग ४५ वर्षावरील नागरिकांना लसीकरण केलं गेलं. आता केंद्र सरकारनं १८ वर्षावरील नागरिकांना देखील १ मेपासून कोरोनाची लस देण्याची परवानगी दिली.

असं असलं तरी ४५ वर्षावरील बऱ्याच नागरिकांनी लस घेतली नाही. सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांमुळे घाबरून बऱ्याच जणांनी लस घेणं टाळलं आहे. कारण लस घेताना ती का घ्यायला हवी हे बहुतेकांना माहित नसतं. आज जाणून घेऊयात की कोरोना प्रतिबंधक लस घेणं का गरजेचं आहे.


  • कोरोना प्रतिबंधक लस ही कोरोना होऊ नये म्हणून घेतली जाते हा गैरसमज पहिला दूर करावा.
  • कोरोना प्रतिबंधक लस ही कोरोना झाल्यावर त्याचे गंभीर किंवा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी व्हावी यासाठी घेतली जाते.  
  • भारतात परवानगी दिलेल्या लस या डिसीज मॉडिफाईड आहेत.
  • त्यामुळे लसींचे दोन डोस घेतल्यानंतरच शरीरात अँटिबॉडिज तयार होतील.
  • शरीरात अँटिबॉडिज (प्रतिपिंड) वाढल्या त्या रोगाशी लढण्याची ताकद तिप्पट होते.
  • अँटिबॉडिज वाढले की प्रतिकारशक्ती वाढते.
  • लसीकरणानंतर रुग्णालयात दाखल करण्याचं प्रमाण ८५ टक्के कमी होतं.



हेही वाचा

कारमध्ये एकटं असल्यास मास्क घालणं बंधनकारक आहे का?

कोरोनापासून बचाव करायचा आहे? मग 'या' नियमांचं पालन करा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा