Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

कोरोनापासून बचाव करायचा आहे? मग 'या' नियमांचं पालन करा

आम्ही तुम्हाला काही नियमांची पुन्हा एकदा आठवण करून देत आहोत. जेणेकरून तुमच्या हे ध्यानात येईल की कोरोनाच्या या नियमांचं पालन करणं किती गरजेचं आहेे.

कोरोनापासून बचाव करायचा आहे? मग 'या' नियमांचं पालन करा
SHARES

कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाल्यापासून, जगातील आरोग्य तज्ञांनी आपल्या आसपासच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी कोविड -१९ प्रोटोकॉलचं पालन करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु, विविध राजकीय पक्षांच्या सदस्यांसह नागरिकही नियमांची पायमल्ली करत असल्याचं दिसून आलं आहे. यामुळे कोरोनाव्हायरसच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

आज आम्ही तुम्हाला काही नियमांची पुन्हा एकदा आठवण करून देत आहोत. जेणेकरून तुमच्या हे ध्यानात येईल की कोरोनाच्या या नियमांचं पालन करणं किती गरजेचं आहेे.

१) मास्क

वारंवार मास्क घालण्यास सांगूनही बरेच लोक याकडे दुर्लक्ष करत आहेत. काही जण मास्क हनुवटीवर किंवा हनुवटीखाली लावतात. बऱ्याच जणांचा मास्क लूज असल्यामुळे घसरतो. घसरणारा मास्क नीट करण्यासाठी मास्कला हात लावला जातो. त्यामुळे या चुका न करता मास्क व्यवस्थित घातला पाहिजे.

२) सोशल डिस्टन्स पाळणं आवश्यक

इतरांपासून ६ फुट लांब राहणं आवश्यक आहे. एखाद्या रुग्णापासून ६ फुट लांब राहिल्यास कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होईल.  

३) हात वारंवार धुवा

तोंडाला स्पर्श करण्यापूर्वी आपले हात धुणे चांगलेच. अगदी १५-२० सेकंद साबण लावून आपले हात धुतले पाहिजेत. याशिवाय सेनिटायझरचा पर्याय उपलब्ध आहे.

४) आरोग्याकडे लक्ष द्या

आपल्यात covid 19 ची लक्षणं तर नाहीत ना? याकडे लक्ष ठेवा. लक्षण असतील तर आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची आवश्यकता आहे का? हे विचारा. सावधगिरीच्या उपायांसाठी, घरी ऑक्सिमीटर ठेवा.हेही वाचा

मासिक पाळी दरम्यान लस घ्यावी का? लसीबद्दलचे 'हे' गैरसमज दूर करा

विमान प्रवास करताय? मग ‘हे’ नियम पाळा!

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा