Advertisement

विमान प्रवास करताय? मग ‘हे’ नियम पाळा!

यात्रेकरुंना विमानतळ आणि विमान प्रवासात हे नियम पाळणं गरजेचं असणार आहे. या नियमांचं पालन केलं नाही तर तुमच्या विमान प्रवासावर बंदी येऊ शकते.

विमान प्रवास करताय? मग ‘हे’ नियम पाळा!
SHARES

देशात खबरदारीचा उपाय म्हणून अनेक राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आलेत. काही ठिकाणी रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असं असतानाही काही लोक नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. प्लाईट आणि बसमध्येही लोक कोरोना नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत. यासाठी DGCAनं कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नवे नियम लागू केले आहेत. यात्रेकरुंना विमानतळ आणि विमान प्रवासात हे नियम पाळणं गरजेचं असणार आहे. या नियमांचं पालन केलं नाही तर तुमच्या विमान प्रवासावर बंदी येऊ शकते.

मास्क योग्यरित्या लावणं गरजेचं

मास्क लावणं तर बंधनकारक आहेच. पण तो योग्यरित्या लावणं गरजेचं आहे. विमान प्रवास करताना मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अनिवार्य आहे. गरज असेल तरच मास्क नाकाच्या खाली घेतला जाऊ शकतो.

CISFला खास जबाबदारी

विमानतळावर एकही व्यक्ती मास्कविना प्रवेश करणार नाही, याची जबाबदारी आता CISF कडे देण्यात आली आहे. सोबतच एअरपोर्ट मॅनेजर/टर्मिनल मॅनेजर प्रवाशाने मास्क योग्यरित्या लावला आहे की नाही, याचीही पाहणी करतील.

सुरक्षा यंत्रणेच्या हवाली केलं जाणार

एखादा प्रवासी कोरोना नियमांचं पालन करत नसेल तर त्याला विमानातून उतरवलं जाऊ शकतं. त्याला सुरक्षा यंत्रणेकडं सोपवलं जाईल. सुरुवातीला प्रवाशाला सुचना दिली जाईल, त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती DGCAनं दिली आहे.

विमानात मास्क लावला नाही तर कारवाई

एखादा प्रवासी यात्रे दरम्यान नियमांचं पालन करत नसेल तर त्याच्यासोबत ‘उपद्रवी यात्री’ प्रमाणे व्यवहार केला जाईल. अशावेळी तुम्ही विमान प्रवास करत असाल तर तुम्हाला या नियमांचे पालन करणं गरजेचं असणार आहे. तुम्ही नियमांचं पालन केलं नाही आणि उपद्रवी यात्रेकरुच्या लिस्टमध्ये तुम्ही आलात तर तुमच्या विमान प्रवासावर बंदी लावली जाऊ शकते. इतकच नाही तर अशा केसमध्ये शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा