Covid Updates: रत्नागिरीत तीन बालकांची कोरोनाच्या Delta plus वर मात

महाराष्ट्रात (maharashtra) कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे (delta plus variant) सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी (ratnagiri) मध्ये आढळले आहेत. डेल्टा प्लसमुळे पहिला मृत्यूही रत्नागिरीत झाला आहे. मात्र आता येथून एक सकारात्मक बातमी आली आहे. रत्नागिरीतील तीन मुलं (children) डेल्टा प्लस व्हेरिएंटमधून बरे झाले आहेत. 

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात डेल्टा व्हेरिएंटचे ९ रुग्ण आढळून आले होते. यामध्ये तीन बालकांचा यामध्ये समावेश होता. ३ वर्षे, ४ वर्षे आणि ६ वर्षांच्या बालकांना डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली होती. मात्र, आता त्यांनी त्यावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रत्नागिरी जिल्ह्यात २९०८ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक बाधित मुले रत्नागिरी तालुक्यातील आहेत. रत्नागिरी तालुक्यातील ८३६ मुलांना कोरोना झाला. 

महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे आणखी १४ नवे रुग्ण आढळले आहेत. डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या आता ३४ पर्यंत गेली आहे. तसंच मध्य प्रदेशातून तपासणीसाठी आलेल्या नमुन्यांमध्ये आणखी तीन डेल्टा प्लस संक्रमित आढळले आहेत.  देशात डेल्टा प्लसच्या एकूण रुग्णांची संख्या ६६ झाली आहे. डेल्टा प्लसचे रुग्ण मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्ये आढळले आहेत. 



हेही वाचा -

महापालिकेच्या शाळांमध्येही डिजिटल वर्ग सुरू होणार

२६/११ हिरो तुकाराम ओंबळे यांचा अनोखा सन्मान, नव्या कोळी प्रजातीला दिले नाव

पुढील बातमी
इतर बातम्या