Advertisement

राज्यातील डेल्टा प्लस व्हॅरिएंटच्या रूग्णांमध्ये वाढ


राज्यातील डेल्टा प्लस व्हॅरिएंटच्या रूग्णांमध्ये वाढ
SHARES

देशातील १२ राज्यात आढळणारा डेल्टा प्लस (Delta plus) वेगाने पसरत आहे. डेल्टा प्लसच्या नवीन रुग्णांनी ६० चा आकडा पार केला आहे. ही धक्कादायक बाब असून, गेल्या एका आठवड्यात महाराष्ट्रात १४ नवीन केसेस समोर आल्या आहेत. महाराष्ट्रात १४ तर देशात ६६ डेल्टा प्लस व्हॅरिएंट पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी महत्त्वाची माहिती दिलीय, महाराष्ट्रात डेल्टा प्लसच्या आणखी १४ नव्या केसेस सापडल्या आहेत.

डेल्टा प्लसने आतापर्यंत ३४ रूग्ण संक्रमित झाले आहेत. तसंच मध्य प्रदेशातून तपासणीसाठी आलेल्या नमुन्यांमध्ये आणखी ३ डेल्टा प्लस संक्रमित आढळले आहेत. अशाप्रकारे, देशात डेल्टा प्लसच्या एकूण रुग्णांची संख्या ६६ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत डेल्टा प्लसचे रुग्ण मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्ये मिळाले आहेत. तर दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातही हा नवा व्हॅरिएंट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या आठवड्यात या ४ राज्यात डेल्टा प्लस आहे की नाही, हे कळू शकेल. कोरोना विषाणूचे गॅमा व्हॅरियंट भारतातून हद्दपार दरम्यान, कोरोना विषाणूचे गॅमा व्हॅरियंट भारतातून हद्दपार झाला आहे. आता देशात गॅमा व्हेरिएंटचे कोणतीही केस शिल्लक नाही, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. मागील पाच महिन्यांपासून हा प्रकार जिनोम सिक्वेसिंगमध्ये दिसत नाही. मागील वर्षी डिसेंबरमध्ये जीनोम सिक्वेंसींग सुरू झाले होते. त्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये अल्फा, बीटा आणि गॅमा रूपे भारतात आली. त्या काळात डेल्टा केसेस नव्हत्या, परंतु फेब्रुवारीपासून केवळ अल्फा, बीटा आणि डेल्टा केसेस दिसू लागली आहेत.

मार्च आणि एप्रिलमध्ये डेल्टा व्यतिरिक्त डेल्टा प्लस आणि एवाय २.० याशिवाय इटा, लोटा आणि कापा व्हॅरिएंट देशात मिळत होता. सद्यस्थितीत दुसरी लाट ओसरल्यानंतर केसेस कमी होऊ लागल्या आहेत. अशा परिस्थितीत, जीनोम सिक्वेंसींगबद्दल बोलायचं झाल्यास, डेल्टाच्या ८६ टक्के केसेस आढळून येत आहेत. या व्यतिरिक्त अल्फा आणि बीटा प्रकार देखील व्हॅरिएंट आहेत. देशात आता गॅमा व्हॅरिएंटचे केसस नाहीत.




हेही वाचा -

महापालिकेच्या शाळांमध्येही डिजिटल वर्ग सुरू होणार

२६/११ हिरो तुकाराम ओंबळे यांचा अनोखा सन्मान, नव्या कोळी प्रजातीला दिले नाव

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा