Advertisement

Delta Plus विषाणूमुळे राज्यात पहिला मृत्यू!

राज्यात डेल्टा प्लस विषाणूचा जास्त धोका नसल्याचं काहीच दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. मात्र, तरीही काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

Delta Plus विषाणूमुळे राज्यात पहिला मृत्यू!
SHARES

कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूच्या (Delta Plus virus) संसर्गामुळे राज्यात पहिला मृत्यू (death)  झाला आहे. रत्नागिरीतील संगमेश्वरमधील ८० वर्षांच्या महिला रुग्णाचा डेल्टा प्लस विषाणूने बळी घेतला आहे. महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. शिवाय, या महिलेला इतर आजारही होते. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिलेल्या माहितीला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दुजोरा दिला आहे.

राज्यात डेल्टा प्लस विषाणूचा जास्त धोका नसल्याचं काहीच दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. मात्र, तरीही काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.  राज्यातील ७ जिल्ह्यात सध्या डेल्टा व्हेरियंटचे २१ रुग्ण आहेत. रत्नागिरीत ९, जळगावमध्ये ७, मुंबईत दोन आणि पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. डेल्टा व्हेरियंट बाबतीत सध्या ३६ जिल्ह्यामधून नमुने घेण्याचे काम सुरू आहे. सध्या तरी राज्यात कुठलेही निर्बंध लागणार नसल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

आतापर्यंत ३४०० नमुन्यांपैकी २१ केसेसमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला आहे. हे प्रमाण ०.००५ टक्के आहे. त्यामुळे कोरोनाचा डेल्टा प्लस प्रकाराची गंभीर वाढ अद्याप झालेली नाही. हा काळजी करण्यासारखा विषय नसला तरी त्याचे गुणधर्म गंभीर असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी  डेल्टा प्लसचे दोन रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात (maharashtra) आढळलेल्या ‘डेल्टा प्लस’च्या २१ रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असल्याचे आढळले आहेत. या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे आणि बाधित रुग्णांचे नमुने तपासण्यांसह सर्वेक्षण आरोग्य विभागाने सुरू केले आहे.

भारतासह १० देशांत ‘डेल्टा प्लस’चे रुग्ण आढळले आहेत. त्यात अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्र्झलड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन आणि रशिया या देशांचा समावेश आहे. तर प्रथम भारतातच आढळलेल्या ‘डेल्टा’ विषाणूचे रुग्ण आतापर्यंत ८० देशांत आढळले आहेत.



हेही वाचा -

महापालिकेचं पहिलं २१ मजली स्वयंचलित वाहनतळ सुरू

तलावांमध्ये आता केवळ १५ टक्के जलसाठा शिल्लक

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा