Advertisement

तलावांमध्ये आता केवळ १५ टक्के जलसाठा

मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण आता मुंबईकरांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.

तलावांमध्ये आता केवळ १५ टक्के जलसाठा
SHARES

मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण आता मुंबईकरांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आता केवळ १५.५४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. चक्रीवादळामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार हजेरी लावणाऱ्या पावसानं विश्रांती घेतली आहे. त्यामुळं आणखी दीड महिना पुरेल इतका हा जलसाठा आहे. परंतु, पावसानं अशीच दांडी मारल्यास पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुंबईत महापालिकेमार्फत दररोज ३ हजार ८०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणं आवश्यक असतं. गेल्या वर्षी तलाव क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळं पाण्याची चिंता मिटली होती.

गतवर्षीच्या तुलनेत सध्या तलावांमध्ये ८० हजार दशलक्ष लिटर अधिक जलसाठा आहे. मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा या तलावांमध्ये सध्या एकूण दोन लाख २४ हजार ८९४ दशलक्ष लिटर जलसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात एक लाख ४४ हजार ७३० दशलक्ष लिटर साठा शिल्लक होता. तर २०१९ मध्ये या काळात पाणीप्रश्न पेटला होता. सध्या तलावांमध्ये असलेला जलसाठा जुलै अखेरीपर्यंत मुंबईकरांची तहान भागवू शकेल.

जलसाठ्याची आकडेवारी

तलाव
कमाल
किमान
उपायुक्त साठा (दशलक्ष)
सध्या
मोडक सागर
१६३.१५
१४३. २६
४९७३१  
१५२.४८
तानसा
१२८.६३
११८.८७
३८५३९
१२२.१०
विहार
८०.१२
७३.९२
१७१९५
७८.०७
तुळशी
१३९.१७
१३१.०७
५९०१
१३७.५०
अप्पर वैतरणा
६०३.५१
५९७.०२
०००
५९२.६३
भातसा
१४२.०७
१०४.९०
८५८६२
१११.३४
मध्य वैतरणा
२८५.००
२२०.००
२७६६६
२४४.५७




हेही वाचा -

सलग दुसऱ्या दिवशी राज्यात लसीकरणाचा विक्रमी उच्चांक

डेक्कन एक्स्प्रेस 'विस्टाडोम'सह २६ जूनपासून पुन्हा धावणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा