ग्रामीण क्षेत्रापेक्षा शहरी भागात कोरोना रुग्णांमध्ये वाढ

महाराष्ट्राच्या शहरी भागात ग्रामीण भागापेक्षा कोरोनाव्हायरसच्या घटनांमध्ये वाढ दिसून येत आहे.

१८ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील शहरी भागातील कोरोना रुग्णांचा वाटा ५७.९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तो फक्त एक महिना आधी ५१ टक्के होता. या शगरीभागांमध्ये २७ महानगरपालिका आहेत. ९ मार्चपासून या भागांमध्ये कोरोना रुग्णांच्या प्रमाणात वाढ होत आहे.

दरम्यान, रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात COVID 19 चे ९ हजार ०६० इतके रुग्ण आढळले. यासोबतच कोरोना रुग्णांचा ऐकूण आकडा १५.९५ लाखाच्या घरात गेला आहे. तर कोरोनामुळे ४२ हजार रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर सध्या ८५.८६ इतका आहे. कोरोनाच्या काळात वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर (व्हीएजी) कॉरिडॉरवर मेट्रो सेवा आज पुन्हा सुरू झाली आहे.

रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी मान्य केलं की, भारत समुदाय प्रसारणाच्या अवस्थेत आहे. तथापि, ते केवळ काही जिल्हे आणि राज्यांपुरते मर्यादित असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.


हेही वाचा

कोविड रुग्णांचा इनडोअर गरबा

भयंकर! कुर्ल्यात शाॅक लागून पालिकेच्या २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू, ७ जण जखमी

पुढील बातमी
इतर बातम्या