Advertisement

भयंकर! कुर्ल्यात शाॅक लागून पालिकेच्या २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू, ७ जण जखमी

मुंबई महापालिकेच्या कामगारांना शाॅक लागल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

भयंकर! कुर्ल्यात शाॅक लागून पालिकेच्या २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू, ७ जण जखमी
SHARES
कुर्ल्यातील सुमन नगर परिसरात फुटलेल्या पाईप लाईनची दुरूस्ती करण्यासाठी गेलेल्या मुंबई महापालिकेच्या कामगारांना शाॅक लागल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या दुर्घटनेत २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कुर्ल्यातील सुमन नगर परिसरात महापालिकेची पाईप लाईन फुटल्याची तक्रार महापालिकेच्या एल विभागाकडे आली होती. त्यानुसार पाईपलाईनच्या दुरूस्तीसाठी वाॅटर डिपार्टमेंटचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पाईप लाईनच्या कामाला सुरूवात केल्यानंतर अचानक कर्मचाऱ्यांना विद्युत प्रवाहाचा जोरदार झटका लागला. ही दुर्घटना इतकी भीषण होती की यात गणेश दत्तू उगले, अमोल काळे या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर नाना पुकाळे, नरेश अधंगाले, राकेश जाधव, अनिल चव्हाण, महेश जाधव हे गंभीर जखमी झाले. या सर्वांना उपचारासाठी तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

या प्रकरणी पोलिसांनी अपघाती गुन्ह्याची नोंद केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत. सोमवारी सकाळी १२ च्या सुमारास ही  घटना घडली.
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा