Advertisement

प्रवाशांच्या चेक-इनसाठी क्युआरकोड स्कॅनर मशिन गेट


प्रवाशांच्या चेक-इनसाठी क्युआरकोड स्कॅनर मशिन गेट
SHARES

कोरोनाचं लक्षण नसल्याचं निष्पन्न झाल्यावरच प्रवाशांना रेल्वे स्थानकावर प्रवेश करता येणार असल्यानं, रेल्वेतील आणि स्थानकांवरील प्रवाशांची गर्दी कमी करता येणार आहे. तसंच, मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं लांबपल्यांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या चेक-इनसाठी क्युआरकोड स्कॅनर मशिनचं गेट तयार करण्यात आलं आहे. या मशिनच्या माध्यमातून प्रवाशांना पुढील प्रवेश दिला जाणार आहे.

सुरूवातीला प्रवाशांकडं असलेल्या तिकीटांवरील क्युआरकोड स्कॅन करावा लागणार आहे. ज्यांचे ई-तिकीट आहे, त्यांच्या मोबाईलवरील क्युआरकोड सुद्धा स्कॅन किंवा ई-तिकीट प्रिंट केलं असल्यास त्यावरील क्युआरकोड स्कॅन करावा लागणार आहे. तिकीट स्कॅन केल्यानंतर प्रवाशांच्या शरीराचं तापमान सुद्धा तपासलं जाणार आहे. यामध्ये प्रवाशांच्या शरीराचं तापमान आणि तिकीट कंन्फर्म नसल्यास जास्त आढळल्यास प्रवाशाला पुढचा प्रवास करता येणार नाही.

हा प्रयोग सध्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेनं सुरू केला आहे. सध्या यातील त्रुट्या दूर करण्याचा प्रयत्न सुरू असून, प्रयोग यशस्वी राहिल्यास इतर रेल्वे स्थानकावर अशा मशिन लावण्यात येणार असल्याचं मध्य रेल्वेनं स्पष्ट केलं आहे. तिकीट कंन्फर्म असलेल्या प्रवाशांच्या व्यतिरिक्त वेटिंग आणि आरएससी असलेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवास करता येणार नाही. त्यामुळं रेल्वेतील गर्दी आणि स्थानकांवरील प्रवाशांच्या गर्दीत घट होणार असून, कोविड-19 च्या नियमांचं आपोआप पालन केले जाणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा