Advertisement

मुंबईत कोविड रुग्णांचा इनडोअर गरबा


मुंबईत कोविड रुग्णांचा इनडोअर गरबा
SHARES

सध्या नवरात्रोत्सव सुरू असून, घरोघरी व सार्वजनिक मंडळांमध्ये देवीचं आगमन झालं आहे. यंदा मुंबईसह राज्यभरावर कोरोनाचं संकट असल्यानं अगदी साधेपणानं देवीचं आगमन झालं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य सरकार व महापालिकेनं नियमांखाली नवरात्रोत्सव साजरा आवाहन केलं आहे. त्यामुळं दरवर्षी नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणार दांडिया-रास व गरबा यंदा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळं सर्वत्र शुकशुकाट आहे. असं असलं तरी या नवरात्रोत्सव अनेकांना कोरोनाची लागण झाल्यानं आपल्या घरापासून लांब राहावं लागतं आहे. तसंच, विलगीकरण केंद्रात असल्यानं काहीच करता येत नाही. त्यामुळं विलगीकरण केंद्रातील रुग्णांना याचा आनंद घेता यावा यासाठी विलगीकरणात गरबा खेळला जात आहे.

सध्या नवरात्रोत्सव सुरू असून अनेकांच्या घरी देवींचं आगमन झालं आहे. पण विलगीकरण केंद्रात असल्यानं यंदा देवींचं दर्शन घेणं अनेकांना शक्य होत नाही आहे. देवीच्या आरतीचा मान मिळत नाही. त्यामुळं रुग्ण नाराज आहेत. रुग्णांची ही नाराजी दूर करण्यासाठी आणि नवरात्रोत्सवाचा आनंद रुग्णांना मिळावा यासाठी नेस्को विलगीकरण केंद्रात गरबा खेळला जात आहे. यामुळं रुग्णाच्या मनावरील ताण कमी होत आहे.

कोरोना हा इतर आजारांपेक्षा वेगळा आणि नागरिकांना 'मानसिक त्रास' देणार आहे. कोरोनाबाबत सातत्याने सुरू असलेल्या चर्चा आणि समाजमाध्यमांवरील संदेशांमुळे निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या वातावरणामुळं मानसिक रुग्णांची अस्वस्थता वाढली आहे. कोरोना संसर्गाचा होणारा प्रसार, वाढती रुग्णांची संख्या याबाबत सर्वत्र होणारी चर्चा, समाजमाध्यमांमधून पसरविल्या जाणाऱ्या अफवा यामुळे रुग्णांमधील मानसिक भीती अकारण वाढत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा