म्हाडा लाॅटरी : 7900 जणांची नोंदणी, तर 3131 अर्ज

मुंबईतील 819 घरांच्या लाॅटरीसाठी नोंदणीपाठोपाठ अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेला रविवार (17 सप्टेंबर) पासून सुरूवात झाली आहे. एका दिवसांत 819 घरांसाठी 3131 जणांनी अर्ज भरले आहेत. तर आतापर्यंत 7900 जणांनी नोंदणी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे एका दिवसांतच 578 अर्ज अनामत रक्कमेसह बँकेकडे जमाही झाले आहेत.

यंदा अत्यल्प गटासाठी केवळ आठच घरे आहेत. तर मध्यम आणि उच्च गटातील घरांच्या किंमती म्हाडाने अव्वाच्या सव्वा फुगवल्या आहेत. त्यामुळे यंदा लाॅटरीला प्रतिसाद मिळणार नसल्याचीच चर्चा रंगली आहे. प्रत्यक्षात मात्र नोंदणीला आणि अर्ज भरण्यास चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 

16 सप्टेंबरला दुपारी 2 वाजल्यापासून आॅनलाईन नोंदणीला सुरूवात झाली असून सोमवारी, 18 सप्टेंबरला सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत 7900 जणांना नोंदणी केली आहे. दरम्यान इच्छुकांकडे नोंदणीसाठी अजून महिन्याभराचा वेळ असल्याने नोंदणीचा आकडा लाखाचा पल्ला पार करेल, असा विश्वास म्हाडाकडून व्यक्त केला जात आहे.

अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला रविवारपासून सुरूवात झाली असून सोमवारी साडे सहा वाजेपर्यंत 3131 जणांनी अर्ज भरले आहेत. आॅनलाईन पेमेन्टसह डीडी पेमेन्टसह अर्ज बँकांकडे सादर करण्यासही सुरूवात झाली असून अर्ज सादर करण्याचा आकडाही समाधानकारक असल्याचे म्हाडाकडून सांगितले जात आहे. कारण एका दिवसांत आँनलाईन पेमेन्टद्वारे 578 अर्ज बँकेकडे सादर झाले आहे. 

डीडी आणि एनईएफटी-आरटीजीएसद्वारेही अनामत रक्कमसह अर्ज बँकाकडे सादर करण्यात येत आहेत. पण पहिल्या दिवशी डीडी आणि एनईएफटी-आरटीजीएसद्वारे नेमके किती अर्ज सादर झाले आहेत याची माहिती बँकांकडून येण्यास वेळ लागतो. त्यामुळे असे किती अर्ज सादर झाले आहेत हे म्हाडाकडे ही माहिती आल्यानंतरच समजेल.


हेही वाचा -

प्रियांका चोप्रा का झाली अपसेट? वाचा...


 डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या