Advertisement

स्वप्नांच्या पलिकडले! लोअर परळच्या घराची किंमत २ कोटींवर


स्वप्नांच्या पलिकडले! लोअर परळच्या घराची किंमत २ कोटींवर
SHARES

म्हाडाच्या घरांच्या किंमतीही मागील काही वर्षांपासून खासगी प्रकल्पातील घरांच्या किमतींना टक्कर देऊ लागल्या आहेत. म्हाडा म्हटलं की 'स्वस्त' घर अशी सर्वसामान्यांची कल्पना धुडकावून लावत यंदा म्हाडाच्या मुंबई मंडळाने लोअर परळच्या घराची किंमत थेट १ कोटी ९५ लाखांवर नेऊन ठेवली आहे. ही किंमत जरी उच्च वर्गातील गटासाठी असली, तरी या किमतीकडे पाहता म्हाडा 'स्वस्त' घरांची संकल्पना मोडू पाहतेय का? असा प्रश्न कुणाही सर्वसामान्याला पडू शकेल.


२ घरांची किंमत १ कोटी ९५ लाख

लोअर परळमध्ये उच्च उत्पन्न गटातील एकूण ३६ घरांचा समावेश आहे. ही घरे मुंबई मंडळाला पुनर्विकासाच्या माध्यमातून मिळाली आहेत. यातील २ घरे अंदाजे ४७० चौ. फुटांची असून याच घरांची किंमत १ कोटी ९५ लाख अशी आहे. तर उर्वरित ३४ घरे अंदाजे ३३० चौ. फुटांची असून या घरांची किंमत १ कोटी ४५ लाख अशी असल्याची खात्रीलायक माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.


'मुंबई लाइव्ह'चे वृत्त तंतोतंत खरे

म्हाडाच्या यंदाच्या सोडतीतील तुंगा पवई येथील घरांची किंमत १ कोटी ६५ लाख असेल, असे वृत्त काही महिन्यांपूर्वी सर्वप्रथम 'मुंबई लाइव्ह'ने दिले होते. या वृत्तानंतर म्हाडात चांगलीच खळबळ उडाली होती. म्हाडाला मोठ्या टीकेलाही सामोरे जावे लागले होते आणि गृहनिर्माण मंत्र्यांनीही याची दखल घेत किंमती कमी करण्याचे आदेश म्हाडाला दिले होते. त्यानुसार म्हाडाने त्वरीत किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे म्हाडाच्या लाॅटरीला विलंब झाला होता. अखेर म्हाडाने लाॅटरीची घोषणा केली असली, तरी म्हाडाची घरे यंदा पहिल्यांदाच कोटीचा आकडा पार करणार हे 'मुंबई लाइव्ह'चे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.


याआधी ८६ लाखांचे घर सर्वात महागडे

म्हाडाच्या लाॅटरीतील आतापर्यंतचे सर्वात महागडे घर हे तुंगा पवई येथील उच्च उत्पन्न गटातील होते. या घराची विक्री गेल्या वर्षी म्हाडाने ८६ लाखांत केली होती.


तुंगा पवईतील घर १ कोटी ४० लाखांत

१ कोटी ६५ लाख अशी किंमत असलेल्या तुंगा पवईतील घरांची किंमत 'मुंबई लाइव्ह'च्या वृत्तानंतर अखेर म्हाडाने कमी केली आहे. त्यानुसार या घराची किंमत १ कोटी ४० लाख अशी असेल, असे समजते.


कित्येक वर्षांनंतर दक्षिण मुंबईत म्हाडाचे घर

गेल्या १०-१२ वर्षांपासून मुंबईतील घरांसाठी दरवर्षी लाॅटरी निघत आहे. आतापर्यंतच्या सर्व लाॅटरीमधील घरे ही मुंबईतील उपनगरामधीलच आहे. तर शहरातील सायन प्रतिक्षानगरमधील घरांचा लाॅटरीत समावेश असतो. असे असताना गेल्या १०-१२ वर्षांपासूनच नव्हे, तर त्या आधीच्याही काही वर्षांत दक्षिण मुंबईतील घरांचा समावेश लाॅटरीत असल्याचे एेकिवात नाही. आता मात्र म्हाडाने कित्येक वर्षांनंतर दक्षिण मुंबईतील तब्बल ३६ घरे १० नोव्हेंबरच्या सोडतीत समाविष्ट केली आहेत. त्यामुळे मुंबईकरांना कित्येक वर्षांनंतर आता पहिल्यांदाच दक्षिण मुंबईत हककाच्या घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण करता येणार आहे. हो, पण त्यासाठी उच्च उत्पन्न गटातील विजेत्याला १ कोटी ९५ लाख ते १ कोटी ४५ लाख रुपये मोजावे लागतील हे नक्की.



हे देखील वाचा -

अखेर म्हाडाने दिली कंत्राटदारांना थकबाकी



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा