Advertisement

म्हाडाच्या लाॅटरीची प्रतिक्षा संपली, आता 10 नोव्हेंबरला लॉटरी


म्हाडाच्या लाॅटरीची प्रतिक्षा संपली, आता 10 नोव्हेंबरला लॉटरी
SHARES

म्हाडाच्या माध्यमातून हक्काच्या घराचं स्वप्न साकार करू पाहणारे मुंबईकर गेल्या कित्येक महिन्यांपासून म्हाडाच्या लाॅटरीची वाट पाहत होते. परंतु म्हाडाकडून त्यांना केवळ तारीख पे तारीख दिली जात होती. अखेर ही प्रतिक्षा संपली असून १० नोव्हेंबरला म्हाडाच्या ८१९ घरांसाठी वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात लाॅटरी फुटणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने गुरूवारी लाॅटरीची अधिकृत घोषणा करत मुंबईकरांना ही खुशखबरी दिली आहे.


अशी असेला लाॅटरीची प्रक्रिया

  • १५ सप्टेंबरला जाहिरात
  • १६ सप्टेंबरला दुपारी २ वाजल्यापासून नोंदणीला सुरूवात
  • २१ आॅक्टोबरपर्यंत नोंदणी राहणार सुरू
  • १७ सप्टेंबर, दुपारी २ वाजल्यापासून अर्ज भरण्यास सुरूवात
  • २२ सप्टेंबर, रात्री १२ वाजेपर्यंत अर्ज भरता येणार
  • १७ सप्टेंबर ते २५ आॅक्टोबरपर्यंत डीडीद्वारे बँकेत अर्ज सादर येतील
  • २५ आॅक्टोबर डीडीद्वारे बँकेत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख
  • १७ ते २४ आॅक्टोबर दरम्यान एनईएफटी-आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरता येईल
  • १० नोव्हेंबरला सकाळी १० वाजता रंगशारदात लाॅटरी फुटणार


इथे आहेत घरे :

घरे
उत्पन्न गट
ठिकाण

अत्यल्प गट
प्रतिक्षानगर, सायन, मानखुर्द, चांदिवली, मागाठाणे-बोरीवली
१९२
अल्प गट
कन्नमवार नगर, चारकोप, कांदिवली, सिद्धार्थनगर, चांदिवली, मानखुर्द, मालवणी, मालाड
२८१
मध्यम गट
प्रतिक्षानगर, सिद्धार्थ नगर, उन्नत नगर, चारकोप, गायकवाडनगर-मालवणी
३३८
उच्च गट
तुंगा पवई, चारकोप, शिंपोली



अशी आहे अनामत रक्कम

  • अत्यल्प गट-१५,३३६ रु.
  • अल्प गट-२५,३३६ रु.
  • मध्यम गट-५०,३३६ रु.
  • उच्च गट-७५, ३३६ रु.


उत्पन्न मर्यादा

  • अत्यल्प गट- रू. २५,००० पर्यंत
  • अल्प गट- रू. २५,००१ ते ५०,००० पर्यंत
  • मध्यम गट-रु. ५०,००१ ते ७५,००० पर्यंत
  • उच्च गट- ७५,००१ वा त्यापेक्षा अधिक

अर्ज शुल्क ३३६ रुपये

इथे करा अर्ज : म्हाडा संकेतस्थळ - https://mhada.maharashtra.gov.in, mhada.gov.in



हे देखील वाचा -

म्हाडाच्या मास्टरलिस्टमध्ये मोठा घोटाळा? मूळ रहिवाशांच्या फायलीच गायब?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा