इको फ्रेंडली गणेश मूर्ती निवडताय? मग 'इथं' बुक करा गणपती

सप्टेंबरच्या १३ तारखेला घरोघरी बाप्पाचं स्वागत केलं जाईल. बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी महिनाभर आधीच सुरू होते. बाप्पाचं डेकोरेशन कसं करायचं? यावर्षी कुठली थीम ठेवायची? याची चर्चा घराघरामध्ये रंगली असेल. बदलत्या काळानुसार इको फ्रेंडली गणपतीचा ट्रेंड हळूहळू उदयास येऊ लागला आहे. अनेक संस्था इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही संस्थांची माहिती देणार आहोत जिथं इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवल्या जातात.

स्प्राऊट्स गणेशा

स्प्राऊट्स ही मुंबईतील नावाजलेली संस्था असून आनंद पेडणेकर यांनी याची स्थापना केली आहे. इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्यावर त्यांचा अधिक भर असतो. दरवर्षी त्यांच्याकडील इको फ्रेंडली गणेश मूर्तींना अधिक मागणी असते. इको फ्रेंडली गणेश मूर्ती असल्यामुळे त्या पाण्यात अवघ्या १० मिनिटांमध्ये विरघळतात. यामध्ये स्प्राऊट्स आणि कॉर्न्स यांच्या बिया असतात. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी बाप्पाचं विसर्जन करून कुंडीमध्ये ही माती ठेवू शकता. त्यातून पुढे रोपटं उगवेल

स्प्राऊट्स ट्रस्ट इथल्या गणेश मूर्तींची उंची ९ इंचापर्यंत असते. ते गणेश भक्तांना एकच सल्ला देतात की, गणेश मूर्ती जेवढी लहान तेवढं पर्यावरणासाठी फायदेशीर आहे. याशिवाय ही संस्था समुद्र किनारी स्वच्छता मोहीमदेखील राबवते. गिरगाव चौपाटीवर गेल्या १२ वर्षांपासून ते स्वच्छता मोहीम राबवत आहेत. दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनानंतर १६ सप्टेंबरला ते गिरगाव चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवणार आहेत.

पत्ता :६८/४ तरूण भारत सोसायटी, चकाला,शहर रोड,अंधेरी (.)

संपर्क : ९८२०१४०२५४

ईमेल sproutsonline@gmail.com

टर्मरिक गणेशा

माती, मुलतानी माती, गेरू आणि हळद यांचा वापर करून इकोएक्जिस्ट ही संस्था गणेश मूर्ती बनवते. गणेश मूर्ती उन्हात सुकवल्या असल्यामुळे विसर्जनादरम्यान पाण्यात सहज विरघळतात. २ ते २३ इंच उंच अशा गणेश मूर्ती इथं उपलब्ध आहेत. याशिवाय त्यांनी समुद्र किनारी निर्माल्य कलशची सोयदेखील केली आहे. या निर्माल्यापासून ते होळीचे रंग तयार करतात.  

कुठे : बी-१७/७०१, सिद्धांचल फेज ३, वसंत विहार हाइट स्कूल, ठाणे (पू.)

संपर्क ९८२०५०२९६८


बाप्पाची रूपं कागदावर साकारणारा अवलिया


ट्री गणेशा

ट्री गणेशाचे वैशिष्ट्य म्हणजे, गणेशमूर्ती लाल माती आणि खतापासून बनवली जाते. या मूर्ती घडवताना त्यात भेंडीच्या बिया पेरल्या जातात. लाल मातीच्या या गणेशाला गेरुचा लाल रंग देऊन फिनिशिंग केले जाते. त्यानंतर ही मूर्ती कुंडीच्या आकाराच्या 'ट्रे'मध्ये ठेवली जाते. दीड दिवस, पाच दिवस किंवा दहा दिवस मूर्तीची पूजा केली जाते. शेवटच्या दिवशी घरातल्या टपातच तुम्ही मूर्तीचं विसर्जन करू शकता. लाल माती असल्याने मूर्ती लगेच पाण्यात विरघळते

विरघळलेली माती तुम्ही कुंडीत टाकू शकता. दोन आठवड्यांनंतर बियांना अंकुर फुटतो आणि त्याचे रोपटे होते. अशाप्रकारे बाप्पा विसर्जनानंतर एका रोपट्याच्या माध्यमातून तुमच्यासोबतच असतोदत्तारी कोथूर या तरूणाची ही संकल्पना आहे. ९ इंचापासून ते १८ इंचापर्यंतच्या ट्री गणेशा आहेत. ज्यांची किंमत २२०० ते ४५०० हजार रूपयांपर्यंत आहे.

कुठे : २८६/३९, बंसिंगर चाळ, जी. के. मार्ग, लोअर परेल

संपर्क : ९८१९३४९३९३

इमेल info@treeganesha.com

पेपर गणेशा

संदीप गजकोश यांच्या पेपर गणेशाची महती परदेशातही पोहोचली आहे. पेपरच्या लगद्यापासून ८ ते १२ इंचाच्या गणेशमूर्ती साकारल्या जातात. पाण्यात केवळ ३० मिनिटांमध्ये पेपरपासून बनवलेल्या गणेशाच्या मूर्ती विरघळतात.

 

कुठे : सी -२९मंगेश कोऑपहाऊसिंग सोसायटी, तानसा पाईपलाईन रोड, टिळक नगर स्टेशन, कामगार नगर, कुर्ला ( .)

संपर्क : ९८९२१७४२४४


हेही वाचा

ही ७ कारणं वाचून इको फ्रेंडली बाप्पाला द्याल पसंती

पुढील बातमी
इतर बातम्या