Advertisement

बाप्पाची रूपं कागदावर साकारणारा अवलिया


SHARES

गणेशाचे रूप हे अबालवृद्धांना भावणारं. त्यात तुम्हाला मित्रत्वदेखील वाटावं, असं काहीतरी त्या रूपात आहे. वर्षानुवर्षे कलाकरांना हे रूप साद घालत आलं आहे. कलानिर्मिती करणाऱ्या जागतिक स्तरावरच्या चित्रकारांपासून ते पारंपरिक शैलीत गणेशमूर्ती साकारणाऱ्या चित्रशाळेतल्या  कलाकारापर्यंत सर्वांनाच या रुपाची मोहिनी पडते. गणेशाचं हेच मोहित करणारं रुप चित्रातून साकारले आहं प्रसिद्ध चित्रकार प्रकाश लहाने यांनी. 



स्केचनुसार मूर्ती

आतापर्यंत बाप्पाची अनेक रूपं प्रकाश लहाने यांनी आपल्या चित्रातून साकारली आहेत. काही मूर्तीकार गणपतीची मूर्ती घडवण्याआधी त्यांच्याकडून गणपतीचे स्केच साकारून घेतात. त्यांच्या स्केचनुसारच मूर्तीकार गणपती घडवतो. अनेक गणेश मंडळांकडून प्रकाश यांना मूर्तीचं स्केच बनवून देण्याची मागणी केली जाते.



 बाप्पाची हजारो रूपं

मागणीनुसार प्रकाश लहाने आपल्या कुंचल्यातून बाप्पाचं मनमोहक रूप कागदावर उतरवतात. लहानेंनी साकारलेली चित्रं पाहिली तर प्रत्येक चित्रात तुम्हाला बाप्पाची वेगळी रूपं पहायला मिळतील. उंदरावर बसलेला बाप्पा, गरुडावर स्वार बाप्पा, बाहुबली स्टाईल विराजमान बाप्पा  अशी बाप्पाची हजारो रूपं त्यांनी आपल्या कुंचल्यातून साकारली आहेत.





'या' पर्यावरणप्रेमीकडून इको फ्रेंडली बाप्पाचं विनामूल्य वाटप

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा