Advertisement

'या' पर्यावरणप्रेमीकडून इको फ्रेंडली बाप्पाचं विनामूल्य वाटप

बहुतांश मुंबईकर हे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर करून तयार केलेल्या गणेशमूर्ती घेतात. हीच परिस्थिती बदलण्यासाठी टी. व्ही. सुधाकर यांनी पुढाकार घेतला आहे. बाप्पाच्या इको फ्रेंडली मूर्तीचा प्रचार करण्यासाठी ते यावर्षी चिकणमातीपासून बनवलेल्या १००० मूर्तींचं वाटप करणार आहेत.

'या' पर्यावरणप्रेमीकडून इको फ्रेंडली बाप्पाचं विनामूल्य वाटप
SHARES

गणेशोत्सव सार्वजनिक आणि घरगुती पद्धतीनं मोठ्या आनंदात, उत्साहात आणि भक्तीभावानं साजरा केला जातो. वर्षागणिक घरगुती, सार्वजनिक गणेशोत्सवात वाढ होताना दिसत आहे. सामान्यत: नागरिक प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा (पीओपी) वापर करून तयार केलेल्या गणेशमूर्ती घेतात

मात्र पीओपी पर्यावरणासाठी हानिकारक असल्यानं शाडूपासून घडवलेल्या गणेशमूर्तींसाठी पर्यावरणवादी संस्था जागरुकता निर्माण करत आहेत. फक्त पर्यावरणवादी संस्थाच नाही तर इको फ्रेंडली बाप्पासाठी सामान्य नागरिकदेखील पुढाकार घेत आहेत. चेंबूरला राहणारे टी. व्ही.सुधाकर यांनी जागरुकता निर्माण करण्यासाठी एक अनोखी संकल्पना राबवली आहे.


काय आहे संकल्पना?

मुंबईत गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. पण आजही बहुतांश मुंबईकर हे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर करून तयार केलेल्या गणेशमूर्ती घेतात. हीच परिस्थिती बदलण्यासाठी टी. व्ही. सुधाकर यांनी पुढाकार घेतला आहे. बाप्पाच्या इको फ्रेंडली मूर्तीचा प्रचार करण्यासाठी ते यावर्षी चिकणमातीपासून बनवलेल्या १००० मूर्तींचं वाटप करणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी ते एकही रुपया आकारणार नाहीत.


क्लेच्या गणेशमूर्तीं वाटणार

१९९५ साली टी. व्ही. सुधाकर हे चेन्नईहून मुंबईला आले. पहिल्या वर्षी त्यांना क्लेपासून गणपतीची मूर्ती बनवणारे मूर्तीकार शोधूनही सापडले नाहीत. पण २०१७ साली त्यांना माटुंगामध्ये एक मूर्तीकार सापडला जो क्लेपासून बाप्पाच्या गणपती बनवतो. इतक्या वर्षांनी बाप्पा आपल्या घरी विराजमान होणार याचा आनंद सुधाकर यांना होता. तेव्हाच सुधाकर यांना ही कल्पना सुचली. त्यानुसार यावर्षी त्यांनी १००० क्लेपासून बनवलेल्या गणेशमूर्तींचे वाटप विनामुल्य करायचं ठरवलं अाहे. या संकल्पनेसाठी टी. व्ही.सुधाकर यांनी १.५ लाख रुपये स्वत:च्या खिशातून खर्च केले आहेत


चेन्नईतून बाप्पाचं आगमन

क्लेपासून बनवण्यात आलेल्या १००० मूर्तींची ऑर्डर मूर्तीकार काशी विश्वनाथ यांना दिली. काशी विश्वनाथ यांच्या चेन्नईच्या वर्कशॉपमध्ये १० महिन्यांपूर्वीच या १००० बाप्पाच्या मूर्ती बनवण्यास सुरुवात झाली.१२ ते १४ इंच अशा बाप्पाच्या मूर्ती असतील. यामध्ये कुठल्याही केमिकलचा वापर करण्यात आलेला नाही. बाप्पाच्या मूर्तीसाठी वापरण्यात येणारे रंग पण नैसर्गिकच आहेत.


कधी होईल मूर्तीचे वाटप?

तुम्हाला देखील सुधाकर यांच्या संकल्पनेत सहभागी व्हायचं आहे?. मग इको फ्रेंडली बाप्पाच्या मूर्तीसाठी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. www.clayganapati.com या वेबसाईटवर तुम्ही नोंदणी करू शकता. पहिल्या येणाऱ्या १००० मुंबईकरांनाच विनामूल्य बाप्पाच्या मूर्ती घेता येतीलआतापर्यंत त्यांच्याकडे ४०० ते ५०० मुंबईकरांनी नोंदणी केली अाहे.   पहिल्या आलेल्या नोंदणींनुसार टी. व्हीसुधाकर यांच्या घरी १२ आणि १३ सप्टेंबर असे दोन दिवस बाप्पाच्या मूर्तीचं वाटप करण्यात येईल.


अनेक वर्षांची परंपरा

टी.व्ही.सुधाकर हे तेलंगणात लहानाचे मोठे झाले. त्यांच्या गावात क्लेपासून गणपती बाप्पा बनवण्यात यायचे. त्यावेळी ५ पैशामध्ये त्यांच्या गावच्या बाजारात हे गणपती विकले जायचे.१९७५ साली याच गणपतींची किंमत ५ रुपये झाली. तेव्हापासून त्यांच्या घरात क्लेपासून बनवलेले गणपतीच विराजमान झाले. क्लेपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन केल्यानंतर त्या मातीत रोपटं लावलं जायचं. वर्षानुवर्षे त्यांच्या घरात अशाच प्रकारे गणेशोत्सव साजरा केला जातो. टी.व्ही.सुधाकर हे कोटक महिंद्रा बँकेचे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष आहेतजर यावर्षी या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाला तर ते पुढच्या वर्षी अनेक शहरांमध्ये हा प्रयोग करणार आहेत.



हेही वाचा

पर्यावरण संवर्धनाचा 'ट्री गणेशा'




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा