मुंबई ते बँकॉक क्रूझची अफलातून सफर!

तुम्ही मुंबईवरून बँकॉकला जाताय? पण फ्लाईटनं प्रवास करायचा कंटाळा आला आहे? काही तरी नवीन ट्राय करायचं आहे? मग मुंबई ते बँकॉक तुम्ही क्रूझनं प्रवास करू शकता. वाइकिंग्स ओशियन क्रूझ, मुंबईमधून दोन नव्या सेवा सुरू करणार आहे. यात मुंबई ते बँकॉक आणि ग्रीसमधल्या थेंस ते मुंबई प्रवासाचा अनुभव तुम्हाला घेता येऊ शकतो.

फक्त १६ दिवसांमध्ये मुंबई ते बँकॉक

फ्लाईटनं बँकॉकला पोहचायला तुलनेने कमी वेळ लागतो. पण क्रूझनं बँकॉकला जाण्याची मजा काही औरच! क्रूझनं तुम्ही १६ दिवसांमध्ये बँकॉकला पोहोचू शकता. या अंतर्गत पर्यटकांना पाच देशांना भेटी देता येतील. १६ दिवसांत ही क्रूझ गोवा, कोलंबो, क्वालालंपूर, सिंगापूर या देशांना भेट देत बँकॉकला पोहोचणार आहे.

सौजन्य

२१ दिवसांत अथेंस ते मुंबई

या क्रूझमुळे अथेंसवरून २१ दिवसांत तुम्ही मुंबई गाठू शकता. पूर्वीच्या काळी ज्या जलमार्गाचा वापर व्हायचा, त्या मार्गाने २१ दिवसांचा प्रवास करत ही क्रूझ भारतात प्रवेश करेल. या अंतर्गत सहा देशांना भेटी देती येतील. प्रवासादरम्यान प्राचीन शहर, प्राचीन बंदर आणि पिरामिड याबद्दल प्रवाशांना माहिती देण्यात येईल.

सौजन्य

कधी सुरू होणार ही सेवा?

मुंबई ते बँकॉक ही क्रूझ सेवा ८ सप्टेंबर २൦१८ला सुरू होईल. तर अथेंस ते मुंबई ही क्रूझ सेवा १९ ऑगस्ट २൦१८ ला सुरू होईल.


हेही वाचा

ऑक्सफर्ड डिक्शनरीतही आता चमचा, दादागिरी आणि जुगाड!

मुंबईतल्या 'या' आलिशान चित्रपटगृहाला एकदा भेट द्याच!

पुढील बातमी
इतर बातम्या