Advertisement

मुंबईतल्या 'या' आलिशान चित्रपटगृहाला एकदा भेट द्याच!


मुंबईतल्या 'या' आलिशान चित्रपटगृहाला एकदा भेट द्याच!
SHARES

सामान्यपणे चित्रपटगृहात आपण पॉपकॉर्न, समोसा असे स्नॅक्स खाऊ शकतो. पण तुम्हाला जर कुणी सांगितलं की, आता सिनेमागृहात चित्रपट पाहता पाहता जेवणाचा आनंद देखील घेता येईल तर? तुमचा विश्वास बसत नसेल. पण हे खरं आहे. आयनॉक्स चित्रपटगृहात आता चित्रपट पाहता पाहता तुम्हाला जेवणाचा आनंद लुटता येणार आहे.

वरळीतल्या एट्रिया मॉलमधल्या आयनॉक्स चित्रपटगृहात तुम्हाला ही नवीन सुविधा देण्यात आली आहे. जिथे लाइव्ह फूड काऊंटर्स असतील. याशिवाय बसण्याची व्यवस्था आणखी आरामदायी करण्यात आली आहे.


या चित्रपटगृहाची वैशिष्ट्ये

  • पाच ऑडिटोरिअम्स (पाच स्क्रिन्स), रिक्लायनर चेअर (आरामदायी खुर्च्या)
  • खाण्याची ऑर्डर घेण्यासाठी वेटर उपलब्ध
  • पॉपकॉर्न, समोसा किंवा सँडविच खायचा कंटाळा आला असेल, तर तुम्ही गरमागरम जेवणाचा आनंद घेऊ शकता


नवीन टेक्नोलॉजीचा वापर

चित्रपटगृहातील स्क्रिन्ससाठी लेजर प्लेक्स या टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. यासोबतच डॉल्बी अॅटमॉस साऊंड आणि थ्री-डी वॉलफोनी सिस्टम्स या टेक्नोलॉजीमुळे प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचा अनुभव अधिक खुलवता येईल.


आलिशान चित्रपटगृहातील तिकिटाची किंमत

या आलिशान चित्रपटगृहातील तिकिटाची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. एका तिकिटाची किंमत १൦൦൦ रुपये आहे. तिकिटाची किंमत तशी जास्तच आहे. पण त्याबदल्यात तुम्हाला आरामदायी सुविधा दिली जात आहे.



हेही वाचा

मुंबईतली खाऊगिरी...

मुंबईत 'गेम्स ऑफ थ्रोन्स' थिमवर कॅफे


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा