Advertisement

मुंबईतली खाऊगिरी...


मुंबईतली खाऊगिरी...
SHARES

मुंबईला लाभलेल्या अनेक वरदानांपैकी एक म्हणजे मुंबईचे खवैय्ये...या मुंबईनं प्रत्येक प्रांतातील वेगळेपण चोख जपून ठेवलं आहे. दक्षिणेकडला इडली डोसा, उत्तरेकडील समोसा कचोरी यासोबतच मुंबईचा वडापाव, पुणेरी मिसळ, खमंग थालीपीठ असे महाराष्ट्रीयन पदार्थ देखील तेवढ्याच चवीनं मुंबईकर खातात. मुंबईत कुणी उपाशी झोपत नाही असं म्हणतात. खरं सांगायचं झालं, तर मुंबईचं हेच खास वैशिष्ट्य आहे.

सगळीकडे खाल्ल्या जाणाऱ्या चांगल्या आणि उत्तम पदार्थांना मुंबईकर स्टाइल टच दिला की वेगळी खाद्यसंस्कृती तयार होते. मुंबईकरांनी याची सुरुवात खूप पूर्वीपासूनच केली आहे, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. नक्की काय आहे मुंबईकरांची चॉईस?


चिकन वडापाव

वडापाव तसा काही मुंबईकरांसाठी नवीन नाही. वडापाव हा व्हेज पदार्थांमध्ये मोजला जातो. पण आता आम्ही तुम्हाला नॉनव्हेज वडापावची ओळख करून देणार आहोत. 


सौजन्य

माहिममधल्या खाऊगल्लीत चिकन वडापाव हा फार प्रसिद्ध आहे. या वडापावमध्ये कन पॅटिस हे ब्रेडमध्ये स्टफ करून देतात. अवघ्या 20 रुपयांमध्ये तुम्ही या चिकन वडापावचा आस्वाद घेऊ शकता!


चीज वडापाव

वडापावचा आणखी एक भन्नाट प्रकार म्हणजे चीज वडापाव. 



झणझणीत वडापाव अख्खाच्या अाख्खा चीजनं भरलेल्या एका बाऊलमध्ये डिब केला जातो. त्यानंतर चीजनं भरलेल्या वडापावची चव तुम्ही चाखू शकता. ओशिवरातल्या एमआरपी इथं हा वडापाव तुम्हाला खाता येईल.


आईस्क्रीम चॉकलेट सँडविच

सँडविचमध्ये सर्वांनाच व्हेज आणि नॉनव्हेज असे प्रकार नक्कीच माहिती असतील. पण तुम्ही कधी चॉकलेट सँडविच खाल्ले आहे का? तसं चॉकलेट आणि आईस्क्रिम हे सर्वांनाच आवडतं. तरुणांमध्ये तर चॉकलेट आणि आईस्क्रिमची प्रचंड क्रेझ आहे. 



मग हेच चॉकलेट आणि आईस्क्रिम सँडविचच्या रूपात तुम्हाला चाखता येणार आहे. सँडविचमध्ये चॉकलेट आणि टॉपवर व्हॅनिला आईस्क्रिम असं हटके कॉम्बिनेशन झालं की बघायलाच नको!... रूईया, पोद्दार आणि वेलिंगकर कॉलेजजवळ तुम्ही या सँडविचचा आस्वाद घेऊ शकता.


मॅगी पिझ्झा

मॅगी हा पदार्थ लहानग्यांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वांच्याच पसंतीचा. हीच मॅगी पिझ्झाच्या स्वरूपात खायला कुणाला नाही आवडणार? 



पिझ्झावर मसाला मॅगी, पनीर टिक्का आणि खूप सारं चीज ही या मॅगी पिझ्झाची खासियत. पवईतल्या हंगरी हेड इथं तुम्ही या मॅगी पिझ्झाचा आस्वाद घेऊ शकता.


वोडका पाणीपुरी

पाणीपुरी हा पदार्थ तर सर्वांच्याच आवडीचा. रगडा, तिखट पाणी आणि गोड चटणी...आहाहा! नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. याचाच एक हटके प्रकार म्हणजे वोडका पाणीपुरी...


तिखट पाण्याऐवजी पुरीमध्ये वोडका वापरला जातो. ओशिवरा इथल्या प्रताप दा ढाबा या हॉटेलमध्ये तुम्ही या पानीपुरीचा आस्वाद घेऊ शकता.


पास्ता डोसा

डोसाचे अनेक वेगवेगळे प्रकार हल्ली प्रचलित आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पास्ता डोसा.



विले पार्लेतल्या मीठीबाई कॉलेजजवळच्या आनंद स्टॉलवर एक नंबर पास्ता डोसा मिळतो.


रबडी विथ गुलाबजाम


सौजन्य


सिजलिंग रबडी विथ गुलाबज हे एक भन्नाट कॉम्बिनेशन आहे. गरमागरम रबडीत गरम गरम गुलाबजाम, त्यावर आईस्क्रिम आणि नट्स...

नक्कीच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल. मग आता वाट कसली बघताय? होऊ दे खर्च. एकदा तरी हे हटके पदार्थ चाखून बघाच...! 



हेही वाचा

या आईस्क्रीममध्ये दडलंय काय ?

मुंबई नेव्हर स्लीप्स !


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा