Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,97,587
Recovered:
57,53,290
Deaths:
1,19,303
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,577
863
Maharashtra
1,21,859
10,066

मुंबई नेव्हर स्लीप्स !


मुंबई नेव्हर स्लीप्स !
SHARES

मुंबई... एक स्वप्नांचं शहर…घड्याळाच्या काट्यावर इथं मुंबईकर धावतात. पण दिवसा घड्याळाच्या काट्यावर धावणा-या या मायानगरीतली रात्र मात्र काही वेगळीच असते. दिवसा गर्दी, गाजावाजा, कल्ला करणारी मुंबई रात्री मात्र बाजूच्या समुद्रासारखी शांत होते. रात्री ना ट्रॅफिक, ना गर्दी, ना हॉर्नचे कर्कश्य आवाज. अशी शांतता ज्यासाठी प्रत्येक मुंबईकर व्याकूळ असतो. मग रोजच्या बिझी रुटीनमधून ब्रेक घेण्यासाठी मुंबईकर लेट नाईट हँगआऊट्सचा प्लॅन करतात. निवांत क्षण घालवण्यासाठी मग सर्व मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, वरळी सीफेस, कुलाबाचा रस्ता धरतात. आपल्या मित्र- मैत्रिणींसोबत समुद्रकिना-यावरच्या कट्ट्यावर बसून गप्पांच्या मैफिली सजतात. वेडवाकडं तोंड करून सेल्फी काढणाऱ्या, मस्ती करणा-या गँग तुम्हाला सहज आढळतील. आणि भटकंती केल्यावर पोटात खड्डा पडणं तर साहजिकच आहे. बट डोंट वरी..मुंबई में सबकुछ है बॉस ! 

बॅचलर्स
गिरगाव चौपाटीच्या विरूद्ध दिशेला आहे हे बॅचलर्स ज्यूस सेंटर. पहाटे चार-पाच वाजेपर्यंत इथं तरूणांचा कल्ला असतो. व्हरायटी असलेले मिल्कशेक आणि ज्युसेस ही बॅचलर्सची खासियत. याशिवाय पिझ्झा आणि सँडविचसारखे तुमचे आवडीचे पदार्थही इथे आहेत. शिवाय जेवणानंतर तोंड गोड करण्यासाठी स्विट्सही इथं आहे. स्ट्रॉबेरी फ्रुट क्रिम ते आईस्क्रीपर्यंत सर्व पदार्थ इथं उपलब्ध आहेत.

बडे मियाँ 
बडे मियाँ तो बडे मियाँ... बडे मियाँ ही सुभानअल्ला... हेच बोल इथं येणा-या प्रत्येकाच्या तोंडी असतात. कुलाब्याच्या ताजमहाल पॅलेसजवळ बडेमियाँ हे छोटं हॉटेल आहे. मोगलाई पद्धतीचे रोल्स आणि कबाब ही ‘बडे मियाँ’ची खासियत. मटण, चिकन, बैदा रोटी आणि अनेक प्रकारच्या नॉनव्हेज पदार्थांचा आस्वाद तुम्हाला घेता येतो. फक्त तुमची कार पार्क करा आणि होऊन जाऊ द्या ऑर्डरचा धमाका.

अयुब्स
भटकंती करणा-यांना फोर्टमधल्या अयुब्सचा देखील चांगला पर्याय आहे. स्वस्तात मस्त असे चिकन रोल्स आणि कबाब इथं तुम्हाला चाखता येतात. चिकन भूना रोल्स आणि दम बिर्याणी तर इथली खासियत. शिवाय खास मशरुम टिक्का ही वेजीटेरियन्ससाठी स्पेशल मेजवानी. 

शेगडी
नॉनवेज खाणा-यांसाठी आणखी एक मेजवानीसाठीचा पर्याय म्हणजे वांद्र्यातल्या 29 रोडवरचं शेगडी. शीख कबाब, चिकन रोल, दम बिर्याणी यासाठी ही ‘शेगडी’ बरीच प्रसिद्ध आहे. अगदी दुस-या दिवशी  सकाळी सातपर्यंत खवय्यांच्या ऑर्डर्स पूर्ण केल्या जातात.

मरीन प्लाझा
चर्चगेटच्या समुद्र किना-याजवळ असलेलं मरीन प्लाझा रेस्टॉरंटही भटकंती करणा-यांसाठी चांगला पर्याय आहे. भारतीय आणि कॉन्टिनेंटल पदार्थासोबतच आईस्क्रिम खाण्याची मजा काही औरच. पहाटे 3 वाजेपर्यंत हे रेस्टॉरंट उघडं असतं.

हाजी अली ज्यूस सेंटर
एवढी झक्कपैकी मेजवानी झाल्यानंतर ज्यूस और  मिल्कशेक तो बनता है बॉस ! मिलशेकमध्ये टाकलेले ड्रायफूट्स आणि सोबतीला थंडगार आईस्क्रिम. याला म्हणतात बेत ! अगदी तुम्ही रात्री दोन- तीन वाजेपर्यंत इथे जाऊ शकता. 

आईस अँड रोल्स
नॉनव्हेज खाणा-यांसाठी मुंबईत भरपूर पर्याय आहेत. मात्र जर तुम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहात, तर मग तुमच्यासाठी एक परफेक्ट ठिकाण आहे. ते म्हणजे मिठीबाई कॉलेजसमोरचं आईस अँड रोल्स. पनीर रोल आणि चीली चीझ ही इथली खासियत. कॉलेज तरूणांसाठी तर हा अड्डाच आहे म्हणा ना !

ये सब होते हुए मुंबई का नाईट लाईफ एन्जॉय नहीं किया तो क्या किया बॉस ! तर मग वाट कसली पहाताय. कळवा दोस्तांना, बनवा प्लॅन आणि होऊन जाऊ द्या खर्च.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा