Advertisement

ऑक्सफर्ड डिक्शनरीतही आता चमचा, दादागिरी आणि जुगाड!


ऑक्सफर्ड डिक्शनरीतही आता चमचा, दादागिरी आणि जुगाड!
SHARES

भारतीय माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. मग ती भारतीय संस्कृती म्हणा, राहणीमान म्हणा, भारतीय पदार्थ म्हणा किंवा भाषा...या सर्वांनी परदेशात एक वेगळंच वलय निर्णाण केलं आहे. आणि त्यात आता भारतीय भाषेचाही समावेश होणार आहे. ७൦ भारतीय शब्दांचा ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये नुकताच समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय भाषा आता सातासमुद्रापार गेली आहे, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही.


ऑक्सफर्ड डिक्शनरीत कोणत्या शब्दांचा समावेश

नवीन डिक्शनरीत अण्णा, अब्बा, बापू, दादा अशा ७൦ शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. तेलुगू, तमिळ, उर्दू, हिंदी आणि गुजराती या भाषेतील शब्दांचा प्रामुख्यानं समावेश करण्यात आला आहे. शिवाय काही मुंबईकर शब्दांचाही समावेश करण्यात आला आहे.


अण्णा

डिक्शनरीत अण्णा या शब्दाचा अर्थ दिला आहे की, भारत आणि पाकिस्तानमध्ये अण्णा हा शब्द सर्रास वापरला जातो. तर, तेलुगू आणि तमिळमध्ये अण्णा या शब्दाचा अर्थ मोठा भाऊ असा होतो. एखाद्याला आदरपूर्वक संबोधण्यासाठी या शब्दाचा वापर होतो.

अब्बा

अब्बा या शब्दाचा अर्थ वडील असा होतो, असं या डिक्शनरीत नमूद करण्यात आलं आहे.

बडा दिन

बडा दिन याचा अर्थ ख्रिसमस देण्यात आला आहे.

चमचा

हा खायला वापरतात तो चमचा नाही! तर कंपन्यांमध्ये बॉसच्या मागे-मागे फिरणाऱ्यांसाठी चमचा हा शब्द वापरला जातो असं म्हटलं आहे.

दादागिरी

मुंबईकरांसाठी तर दादागिरी हा शब्द काही नवीन नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात दादागिरी करणारा कोण ना कोण असतोच. तोही शब्द आता ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये आहे.

जुगाड

भारतीयांना या शब्दाचा अर्थ चांगलाच माहीत असेल. तुमच्यापैकी किती तरी जणांनी काम पूर्ण करण्यासाठी जुगाड केला असणारच! पण तुमच्या या जुगाडचा अर्थ आता जगाला कळणार आहे!



याशिवाय वडा, गुलाबजाम, भिंडी, खिमा, चणा डाळ, सूर्य नमस्कार, टाईमपास, फंडा, अच्छा, नाटक या भारतीय शब्दांना देखील डिक्शनरीत त्याच्या अर्थांसह स्थान मिळाले आहे. संस्कृती आणि अन्नपदार्थांशी संबंधित शब्दांचा जास्तीत जास्त वापर डिक्शनरीत करण्यात आला आहे.


याआधी ९൦൦ शब्दांचा डिक्शनरीत समावेश

यापूर्वी ऑक्सफर्ड डिक्शनरीत ९൦൦ भारतीय शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. अरे यार, अय्यो, बदमाश, दीदी, मघी, मसाला, भेलपुरी, पापड, चुडिदार, धाबा अशा ९൦൦ शब्दांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे आता ऑक्सफर्ड डिक्शनरीत समाविष्ट भारतीय शब्दांची संख्या जवळपास १൦൦൦ झाली आहे.



हेही वाचा

अंतराळात कसे आवाज येतात माहितीये? नासाचे हे रेकॉर्डिंग्ज ऐका!

'सारेगमप' विजेता श्रेयन भट्टाचार्यशी खास बातचित


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा