आता कुत्रा हरवण्याचं टेन्शन नाही!

तुम्ही पाळलेला कुत्रा अचानक गायब होतो. कित्येक दिवस शोधाशोध करूनही त्याचा थांगपत्ता लागत नाही. अशा परिस्थितीत कुठल्याच कामात लक्ष लागत नाही. माझ्यासोबत काय असं अनेकांसोबत झालं आहे. पण तुम्हाला हे संकट टाळता येणं शक्य आहे. यासाठी 'रनवे ब्राईड' या कंपनीनं पुढाकार घेतला आहे. या कंपनीनं कुत्र्यांसाठी 'ट्रॅकिंग डिव्हाईस' लाँच केले आहेत.

ट्रॅकिंग डिव्हाईसची खासियत

'रनवे ब्राईड'नं तयार केलेल्या डिव्हाईसमुळे तुमचा कुत्रा कुठे जातो आणि काय करतो? याची माहिती मिळणं सोपं झालं आहे. फक्त एवढंच नाही, तर या डिव्हाईसच्या मदतीनं तुम्ही कुत्र्याच्या फिटनेसवर देखील लक्ष ठेवू शकता. तुम्हाला हे डिव्हाईस कुत्र्याच्या मानेवर लावायचे आहे. चार रंगांमध्ये सध्या हे ट्रॅकिंग डिव्हाईस उपलब्ध आहे. तुमच्या कुत्र्याच्या रंगानुसार तुम्ही डिव्हाईस निवडू शकता

ट्रॅकिंग डिव्हाईस खरेदी केल्यानंतर मोबाईलमधल्या 'वॅगर' या अॅपशी लिंक करा. तुम्ही अगदी ऑफिसमधून किंवा इतर कुठल्या ठिकाणाहून देखील कुत्र्यावर नजर ठेऊ शकता. या 'वॅगर' अॅपमुळे जवळपास असणाऱ्या पेट सलूनची माहिती देखील तुम्हाला मिळू शकते. या ट्रॅकिंग डिव्हाईससाठी तुम्हाला ७००० रुपये मोजावे लागतील.

सो आता टेन्शन नॉट...तुमचा कुत्रा कुठे ही जाऊदे, पण या डिव्हाईसमुळे त्याचा शोध घेणं काही कठीण नाही. यासंदर्भात अधिक माहिती हवी असेल किंवा डिव्हाईसची ऑर्डर द्यायची असेल तर या लिंकवर क्लिक करा.


हेही वाचा

मॅड अबाऊट डॉग्स? मग तुमच्यासाठी आहेत हे 'मॅड सेंटर्स'!

पुढील बातमी
इतर बातम्या