Advertisement

कॅफे, पेट्स अँड यू


कॅफे, पेट्स अँड यू
SHARES

कुटुंबाचा एक महत्त्वाचा सदस्य म्हणून कुत्र्यांना घरात स्थान दिलं असलं तरी समाजात वावरत असताना सार्वजनिक ठिकाणी श्वानांना नेण्यात मर्यादा येतात. आता हेच बघा ना, कित्येक रेस्टॉरंटमध्ये श्वानांना किंवा मांजरींना नो एन्ट्रीच असते. पण अंधेरीतल्या 'कॅफे पॅफे' या रेस्टॉरंटनं एक हटके थीम राबवली आहे.



काय आहे ही थीम?

कॅफे पॅफे या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही श्वानांना आणि मांजरींना घेऊन जाऊ शकता. फक्त घेऊनच नाही, तर तुम्ही तुमच्या प्राण्यांसोबत कॅफेतल्या पदार्थांचा आस्वाद देखील घेऊ शकता. पिझ्झा, पास्तासारख्या पदार्थांचा आस्वाद तुम्ही तुमच्या श्वानांसोबत घेऊ शकता. विशेष म्हणजे तुमच्या बिलामधील ५ टक्के हिस्सा आरोग्य आणि कल्याणकारी योजनांसाठी देण्यात येईल.




काय आहे कॅफेची खासियत?

कॅफेतल्या वेगवेगळ्या डिशेस ही इथली खासियत आहे. तुम्ही जर तिकडे गेलात तर इटली नॅशनल सूप ( २०५ रुपये) नक्की ट्राय करा. त्यांचा आणखी एक पदार्थ म्हणजे कॅट (३०५ रुपये). जो ग्रील्ड पेस्टो चीझ आणि पालक यापासून बनवलेला आहे. पिझ्झामध्ये त्यांचा ओम शांती ओम पिझ्झा (३०५ रुपये) आणि बम-चिक-बम पिझ्झा तर तुम्हाला खूपच आवडेल. याशिवाय पास्ता, राईस, टाय डिशेस, बर्गर अशी मोठी यादी आहे.




तुमच्या पेटसाठी मेनू

फक्त तुमच्यासाठीस नाही तर तुमच्या छोट्या मित्रांसाठी देखील खास मेनू आहे. पास्ता, पिझ्झा बिस्कीट विथ स्पेशल ग्रेवी आणि स्वीट्सचा यांत समावेश आहे.  



हेही वाचा-

मुंबईत पुन्हा आलं तरंगतं हॉटेल!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा