Advertisement

मॅड अबाऊट डॉग्स? मग तुमच्यासाठी आहेत हे 'मॅड सेंटर्स'!

मॅड सेंटर्समध्ये डॉग्ससाठी सलून, स्पा, ट्रेनिंग इन्स्टिट्युट अशा सुविधा पुरवण्यात येतील. एका वर्षात मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूत सेंटर उभारण्यात येणार आहेत. सध्या मॅड सेंटर्सची सेवा जयपूरमध्ये सुरू करण्यात आली आहे. या सेंटर्समद्ये तुम्ही कुत्र्यांसोबत वेळ घालवू शकता.

मॅड अबाऊट डॉग्स? मग तुमच्यासाठी आहेत हे 'मॅड सेंटर्स'!
SHARES

एखादा क्यूटसा कुत्रा किंवा पपी पाळायला कुणाला नाही आवडणार? पण हे काही सर्वांनाच शक्य होण्यासारखं नाही. कारण मुंबईसारख्या शहरामध्ये प्रत्येक जण आपल्या कामात प्रचंड व्यस्त असतो. त्यामुळे एखादा कुत्रा घरी आणावा, त्याचा सांभाळ करावा हे फक्त ऐकायला चांगलं वाटतं. वेळेअभावी म्हणा किंवा कुणाच्या घरी पपी वैगरे चालत नाहीत, अशा काही ना काही अडचणी असतातच. त्यामुळे क्यूट पपी पाळण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहतं. पण आता तुम्हाला तुमचं स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याची संधी मिळत आहे! कशी?मॅड अबाऊट डॉग्स

डॉग लव्हर्ससाठी भारतात डॉग सेंटर सुरू करण्याची कल्पना जयपूरमध्ये राहणाऱ्या वीरेन शर्माला सुचली. त्यानुसार भारतातल्या काही शहरांमध्ये १०० मॅड म्हणजेच 'मॅड अबाऊट डॉग्स' सेंटर्स उभारण्यात येणार आहेत. या मॅड सेंटर्समध्ये डॉग्ससाठी सलून, स्पा, ट्रेनिंग इन्स्टिट्युट अशा सुविधा पुरवण्यात येतील. एका वर्षात मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूत सेंटर उभारण्यात येणार आहेत. सध्या मॅड सेंटर्सची सेवा जयपूरमध्ये सुरू करण्यात आली आहे. या सेंटर्समद्ये तुम्ही कुत्र्यांसोबत वेळ घालवू शकता. याशिवाय जर तुम्हाला एखाद दिवस कुत्रा घरी घेऊन जायचा असेल, तर ते देखील करू शकता. अर्थात यासाठी तुमच्याकडून तासानुसार पैसे आकारले जातील.स्ट्रीट डॉग्स

मॅड सेंटरमध्ये तुम्हाला रस्त्यावर राहणारे आणि रेस्क्यू केलेले कुत्रेही आढळतील. पण घाबरू नका. इथे रस्त्यावर राहणाऱ्या आणि रेस्क्यू केलेल्या कुत्र्यांना ट्रेनिंग देण्यात येतं. त्यामुळे हे कुत्रे कुणाला चावणार नाहीत.

वाढत्या कामाचा ताण कमी व्हावा आणि धकाधकीच्या आयुष्यात विरंगुळा म्हणून हे सेंटर्स उभारण्यात येत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला देखील कुत्र्यांसोबत वेळ घालवायला आवडत असेल, तर या सेंटर्सला तुम्ही भेट देऊ शकता. सप्टेंबरपर्यंत मॅड सेंटर्स मुंबईतही उभारण्यात येण्याची शक्यता आहे.हेही वाचा

घरात एकट्या मांजरीचा सांभाळ कोण करणार? गार्डियन ऑफ द पर आहेत ना!


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा