पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाअाड जातील - मुख्यमंत्री फडणवीस

कोरेगाव भीमा दंगल आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात अालेल्या कवी वरवरा राव, अ‍ॅड. सुधा भारद्वाज, अ‍ॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा  या ५ डाव्या विचारवंतांच्या नजरकैदेत सर्वोच्च न्यायालयाने आणखी चार आठवड्यांची वाढ केली आहे. त्यांच्याविरोधातील कारवाई राजकीय हेतूने करण्यात आली नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने  स्पष्ट केलं अाहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं अाहे. देशविरोधी कारवाई करणाऱ्या या पाचही जणांविरोधात पुरावे असून ते कोर्टात सादर करण्यात येणार अाहेत असं सांगून पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं अाहे.

पुरावे नक्षलवाद्यांशी संबंधित

न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. पुणे पोलिसांच्या कारवाईचं सर्वोच्च न्यायालयानं समर्थन केलं अाहे. पोलिसांची ही भूमिका योग्यच होती असं सांगत मुख्यमंत्री म्हणाले की,  पुरावे गोळा केल्यानंतरच पुणे पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेले पुरावे नक्षलवाद्यांशी संबंधित अाहेत. यावर अाता न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं अाहे.

देशाविरोधात षडयंत्र 

या पाचही जणांनी देशाविरोधात षडयंत्र रचून पंतप्रधानांच्या हत्येचा कटही रचला. जातींमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करून त्यांनी माओवाद्यांना अर्बन चेहरा देण्याचा प्रयत्न केला अाहे. त्यांच्याविरोधात अामच्याकडे अाणखी पुरावे अाहेत. ते अाम्ही कोर्टात सादर करणार अाहोत, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं अाहे.


हेही वाचा - 

नक्षलवाद कनेक्शन प्रकरणी 'ते' पाच जण महिनाभर नजरकैदेत


पुढील बातमी
इतर बातम्या