नक्षलवादी कनेक्शन प्रकरण: ५ विचारवंतांना १७ सप्टेंबरपर्यंत नजरकैद


नक्षलवादी कनेक्शन प्रकरण: ५ विचारवंतांना १७ सप्टेंबरपर्यंत नजरकैद
SHARES

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या ५ डाव्या विचारवंतांची नजरकैद सर्वोच्च न्यायालयाने १७ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. या पाचही जणांना भीमा कोरेगाव दंगल आणि कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (माओ)च्या नक्षलवाद्यांशी संबंध ठेवल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली होती.

पुणे पोलिसांनी वर्नन गोन्साल्विस, अॅड. अरुण परेरा, कवी. वरवरा राव, अॅड. सुधा भारद्वाज आणि गौतम नवलाखा ५ या डाव्या विचारवंतांना देशभरात ९ ठिकाणी छापे टाकून २८ आॅगस्टला बेकायदेशीर घडामोडी प्रतिबंधक कायद्यां (यूएपीए)तर्गत अटक केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना कोठडी देण्याऐवजी नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते.

या नजरकैदीची मुदत १२ सप्टेंबरला संपली. त्यानंतर सुनावणीच्या दिवशी आरोपींची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी अनुपस्थित राहिल्याने न्या. दीपक मिश्रा यांनी ही सुनावणी १७ तारखेपर्यंत पुढं ढकलली. तोपर्यंत या आरोपींची नजरकैद कायम राहणार आहे.



हेही वाचा-

कोरेगाव-भीमा हिंसाचार: पत्रकार परिषद घेतलीच कशी? पोलिसांना न्यायालयाने खडसावलं

सनातनला वाचवण्यासाठी डाव्या विचारवंतांना अटक- न्या. बी. जी. कोळसे पाटील



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा