कसा असेल मुंबईचा कोस्टल रोड? आदित्य ठाकरेंचं ट्विट

कोस्टल रोडसाठीची केंद्रीय पर्यावरण खात्याची बहुप्रतिक्षित मंजुरी मिळाल्यानंतर लागलीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही बातमी मुंबईकरांना सांगितली. भाजपच्या कार्यकाळात अवघ्या दोनच वर्षांत कोस्टल रोडसाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्याचा दावाही करण्यात आला होता. मात्र त्यानंतर आता युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून 'आम्ही कोस्टल रोड बांधून वचनपूर्ती करणारच' अशा आशयाचे ट्विट केले आहे.

'उद्धवजींनी 2013मध्ये सादर केलेले शिवसेनेचे वचन-कोस्टल रोड' असे ट्विट करत आदित्य ठाकरेंनी श्रेयवादाच्या लढाईत उडी घेतली आहे. शिवाय या ट्विटमध्ये त्यांनी कोस्टल रोडचा आराखडा दाखवणारा एक व्हिडिओही शेअर केला आहे.

कोणत्याही योजनेच्या श्रेयासाठी राजकीय पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगण्याचा प्रकार मुंबईकरांसाठी काही नवीन नाही. मात्र त्यातून मुंबईकरांच्या पदरी काय आणि किती पडेल याचीच चिंता सध्यातरी तमाम मुंबईकरांना सतावत असणार हे नक्की !


हेही वाचा

कोस्टल रोडला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा हिरवा कंदील

कोस्टल रोडचा विस्तार थेट घोडबंदरपर्यंत

कोस्टल रोडच्या सर्वेक्षणाला सुरुवात


पुढील बातमी
इतर बातम्या