कोस्टल रोडला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा हिरवा कंदील

 Mumbai
कोस्टल रोडला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा हिरवा कंदील
Mumbai  -  

गेल्या अनेक वर्षांपासून परवानग्यांच्या कचाट्यात अडकलेल्या मुंबई कोस्टल रोडला केंद्राने हिरवा कंदिल दाखवला आहे. कोस्टल रोडला केंद्राकडून अंतिम मंजुरी मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून दिली.

कोस्टल रोड बनविण्यासाठी एकूण 22 परवानग्या लागत होत्या. त्यातील पर्यावरण खात्याची परवानगी मिळाली नव्हती. मात्र मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष घातल्यामुळे पर्यावरणाची परवानगीही आता मिळाली आहे. भाजपाच्या काळात फक्त दोन वर्षात सर्व परवानग्या मिळाल्या आहेत अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्वीटरमध्ये दिली.

अंदाजे 15,000 कोटींची कोस्टल रोड योजना आहे. मरिन लाईन्स ते चारकोप, कांदिवलीपर्यंत कोस्टल रोड असणार आहे. कोस्टल रोडचे काम दोन फेजमध्ये होणार आहे. 8 लेन असलेल्या कोस्टल रोडच्या दोन लेन फक्त बस आणि अत्यावश्यक सेवेसाठी असणार आहेत.

मुंबई महापालिकेमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेनेचा कोस्टल रोड हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मागील महापालिका निवडणुकीच्या वेळी भाजपानेही आपल्या जाहीरनाम्यात कोस्टल रोडचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता या कोस्टल रोडवरून देखील शिवसेना आणि भाजपामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू होईल असं चित्र दिसत आहे.

Loading Comments