कोस्टल रोडच्या सर्वेक्षणाला सुरुवात

 Pali Hill
कोस्टल रोडच्या सर्वेक्षणाला सुरुवात

मुंबई - मुंबईच्या विकासातील अत्यंत महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या अशा कोस्टल रोड प्रकल्पाच्या भू-तांत्रिक सर्वेक्षणला शुक्रवारपासून सुरुवात झालीय. पहिल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलापासून वांद्रे-वरळी सागरी मार्गापर्यंतच्या 998 किमी लांबीच्या प्रस्तावित रस्त्यावर 30 ते 40 मीटर खोलीची छिद्रे घेण्यात येणार आहेत. या छिंद्राद्वारे भू-तांत्रिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या कामाची पाहणी शुक्रवारी पालिका आयुक्त अजॉय मेहता, अतिरिक्त महापालिका आयुक्त संजय देशमुख यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली. दरम्यान 31 जानेवारी 2017 पर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण होईल, असं पालिकेकडून सांगण्यात आलं. प्रकल्पाचं काम सुरू करण्याच्यादृष्टीने भू-तांत्रिक सर्व्हेक्षण हा महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळं कोस्टल रोड प्रकल्पाच्या भू-तांत्रिक सर्वेक्षणाला सुरुवात झाल्यानं हा प्रकल्प दृष्टीक्षेपात आल्याचं म्हटलं जात आहे.

Loading Comments