नार्वेकर बनले मुख्यमंत्र्यांचे ‘ओएसडी’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेत असताना त्यांची सावली समजले जाणारे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर त्यांच्यासोबत मंत्रालयातही कार्यरत राहणार आहेत. नव्या मुख्यमंत्र्यांनी आपले विशेष कार्य अधिकारी (OSD) म्हणून मिलिंद नार्वेकर यांचीच नियुक्ती केली आहे. तर अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे मुख्यमंत्र्यांचे विशेष सचिव म्हणून काम बघणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

हेही वाचा- मिलिंद नार्वेकर आणि शिवसेना!

उद्धव ठाकरे यांचे पर्सनल असिस्टंट असलेल्या नार्वेकर यांनी पक्षात आपला खास दबदबा निर्माण केला आहे. ते केवळ उद्धव ठाकरे यांचे राजकीय सल्लागारच नाही, तर पक्षांतर्गत रणनिती ठरणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी एक बनले आहेत. शिवसेनेचं सचिवपदही त्यांनी याच कौशल्याच्या आधारावर मिळवलेलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार बनवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बोलणी करण्यापासून ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी उद्धव यांनी आदित्य यांच्यासोबत नार्वेकरांनाच पाठवलं होतं.

मुख्यमंत्री नेहमीच आपल्या विश्वासातील व्यक्तीची ‘ओएसडी’ म्हणून नियुक्ती करतात. त्याअनुषंगाने नार्वेकर यांची यापदी निवड होणं अपेक्षितच म्हणावं लागेल. त्यामुळे यापुढं प्रशासकीय कामकाज करताना नार्वेकरांची मोठी मदत उद्धव ठाकरेंना होणार आहे. 


हेही वाचा- 

आमदार नसलेले उद्धव ७ वे मुख्यमंत्री, त्यांच्या आधी कोण?

मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत बहुमत सिद्ध करण्यावर खलबतं, फडणवीसांचा आरोप


पुढील बातमी
इतर बातम्या