विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड होण्याआधीच देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रं हाती घेतल्याचं दिसत आहे. नवं सरकार अस्तित्वात येताच अगदी पहिल्या दिवसापासूनच त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडीवर हल्लाबोल करण्यास सुरूवात केली आहे. शपथविधीनंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांऐवजी बहुमत सिद्ध करण्याविषयी खलबतं झाल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
कालच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपुन-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 29, 2019
मग बहुमताचे दावे कशासाठी?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी शिवाजी पार्क मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या ६ नेत्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यानंतर लगेचच सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात रायगड किल्ल्याच्या विकासासाठी २० कोटी रुपये मंजूर करण्याच्या निर्णयाचाही समावेश होता.
महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 28, 2019
नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या!
परंतु मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत शेतकऱ्यांऐवजी बहुमत सिद्ध करण्याविषयी खलबतं झाल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून केला आहे. त्याआधी त्यांनी महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाच्या घोषणेवरून प्रादेशिकपणाचा आरोप केला होता.
हेही वाचा-
फडणवीस सरकारने ५ लाख कोटींचं कर्ज लादलं, वाचा सद्यस्थिती
आमदार नसलेले उद्धव ७ वे मुख्यमंत्री, त्यांच्या आधी कोण?