Advertisement

आमदार नसलेले उद्धव ७ वे मुख्यमंत्री, त्यांच्या आधी कोण?

शिवसेना पक्षप्रमुख ​उद्धव ठाकरे​​​ यांनी गुरूवारी शिवाजी पार्क मैदानात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर ते विधीमंडळाच्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसलेले ७ वे मुख्यमंत्री बनले आहेत.

आमदार नसलेले उद्धव ७ वे मुख्यमंत्री, त्यांच्या आधी कोण?
SHARES

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी शिवाजी पार्क मैदानात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर ते विधीमंडळाच्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसलेले ७ वे मुख्यमंत्री बनले आहेत. ते शुक्रवारी आपला पदभार स्वीकारणार आहेत.  

उद्धव ठाकरे यांच्या आधी बॅरिस्टर ए.आर. अंतुले, वसंतदादा पाटील, शिवाजीराव पाटील निलंगेकर, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसताना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर ६ महिन्यांच्या आत ते विधानसभा किंवा विधानपरिषदेत आमदार म्हणून निवडून आले होते. 

हेही वाचा- रायगडाच्या विकासासाठी २० कोटी मंजूर, मुख्यमंत्र्यांची घोषणा

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना आता नियमानुसार विधीमंडळाच्या विधानसभा किंवा विधानपरिषदेचा सदस्य अर्थात आमदार व्हावं लागणार आहे. पण ते कुठल्या सभागृहात जातील हे अजूनही ठरलेलं नाही. त्यांना विधानसभेवर जायचं असल्यास कुठल्या तरी आमदाराला राजीनामा द्यावा लागेल. त्या जागेवरील पोटनिवडणुकीत निवडून आल्यावरच त्यांना विधानसभेत प्रवेश मिळेल. 

अथवा पुढच्या ६ महिन्यांमध्ये विधान परिषदेच्या १२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ते वरिष्ठ सभागृहात जाऊ शकतील.हेही वाचा-


‘हे’ ६ नेते बनले कॅबिनेट मंत्री

शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलले?Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा