उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा लांबणीवर? 'हे' असू शकतं कारण

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नियोजीत अयोध्या दौरा लांबणीवर पडल्याचं म्हटलं जात आहे. ठाकरे येत्या २४ नोव्हेंबर रोजी अयोध्येला जाणार होते. सध्या महाराष्ट्रातील सत्तापेच सुटलेला नसल्याने हा दौरा पुढं ढकलल्याचं सांगण्यात येत आहे. 

अयोध्या खटल्याच्या निकालाचं स्वागत करत उद्धव ठाकरे यांनी आपण आधी शिवनेरी आणि नंतर अयोध्येला भेट देणार असल्याचं पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं. उद्धव ठाकरे या दौऱ्यात शिवसेनेचे नवनिर्वाचीत आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन अयोध्येला जाणार होते. 

परंतु राज्यातील सत्तापेच सुटण्याऐवजी वेळखाऊ ठरत असल्याचं दिसून येत आहे. शिवाय अयोध्येचा दौरा करण्यात कायदेशीर अडचणी येण्याची शक्यता आहे. या बाबींकडे पाहता हा नियोजीत दौरा पुढं ढकलण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. हा दौरा कधी आयोजित करण्यात येईल, याबद्दल अद्याप कुठलीही माहिती उपलब्ध नाही.


हेही वाचा- 

न्यायदेवतेला दंडवत, पुन्हा अयोध्येला जाणार- उद्धव ठाकरे

फडणवीस ज्योतिषशास्त्राचे विद्यार्थी आहेत काय? शरद पवारांचा टोला


पुढील बातमी
इतर बातम्या