Advertisement

काँग्रेससोबत सकारात्मक चर्चा- उद्धव ठाकरे

महाशिवआघाडीची सत्ता केव्हा स्थापन होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना काँग्रेससोबतची चर्चा सकारात्मक पद्धतीने सुरू असून योग्यवेळी निर्णय कळवण्यात येईल, अशी माहिती ​शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे​​​ यांनी दिली.

काँग्रेससोबत सकारात्मक चर्चा- उद्धव ठाकरे
SHARES

महाशिवआघाडीची सत्ता केव्हा स्थापन होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना काँग्रेससोबतची चर्चा सकारात्मक पद्धतीने सुरू असून योग्यवेळी निर्णय कळवण्यात येईल, अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दुपारी ट्रायडंट हाॅटेलमध्ये काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. या बैठकीनंतर हाॅटेलबाहेर पडताना उद्धव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेससोबत सकारात्मक चर्चा सुरू असून योग्यवेळी निर्णय जाहीर करण्यात येईल, असं सांगितलं.

याआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे विश्वासू अहमद पटेल यांची उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री उशीरा भेट घेतली होती. या भेटीनंतर पटेल दिल्लीला रवाना झाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सत्ता स्थापनेसाठी वेगवान हालचाली सुरू आहेत. शिवसेना नेते विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर हे दोघेही काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करत आहेत.



हेही वाचा-

डिस्चार्ज मिळताच संजय राऊतांची तोफ धडाडली, पहिला निशाणा भाजप-राज्यपालांवर

मध्यावधी निवडणुकीची शक्यताच नाही, शरद पवार यांनी दिला आमदारांना विश्वास


 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा