मध्यावधी निवडणुकीची शक्यताच नाही, शरद पवार यांनी दिला आमदारांना विश्वास


SHARE

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन सरकार स्थापन केल्यास महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होणार अशी टीका होत असताना कुठल्याही प्रकारे सत्ता स्थापन करणारच असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या आमदारांना दिला. 

हेही वाचा- महाशिवआघाडीचा फाॅर्म्युला ठरला? 'असं' होईल सत्तेचं वाटप

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला मार्गदर्शन करताना पवार यांनी मध्यावधी निवडणुकीच्या सर्व शक्यता फेटाळून लावल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची किमान समान कार्यक्रमावर चर्चा सुरू आहे. तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्यावर सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल. कुठल्याही प्रकारे राज्यात सरकार स्थापन करण्यात येईल, असं पवार म्हणाले.

हेही वाचा- ..तेव्हाच शिवसेनेसोबत चर्चा, काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका

राज्यपालांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देऊनही एकाही पक्षाला सरकार स्थापनेसाठी अपेक्षित संख्याबळ जमवता न आल्याने महाराष्ट्रात मंगळवारपासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.

तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केल्यास महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुकीला सामोरं जावं लागेल, अशी शक्यता काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी व्यक्त केली होती. तर भाजपनेही मध्यावधी निवडणुकीची शक्यता गृहीत धरून आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.हेही वाचा-

'नीळकंठ' व्हायला आम्ही तयार ! सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका

अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागूसंबंधित विषय
ताज्या बातम्या