Advertisement

'नीळकंठ' व्हायला आम्ही तयार ! सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टिका

भाजपबरोबर अमृताच्या पेल्यातील विषाचा घोट आम्ही रिचवल्यावर आता महाराष्ट्रातील अस्थिरता संपविण्यासाठी 'नीळकंठ' व्हायला आम्ही तयार आहोत.

'नीळकंठ' व्हायला आम्ही तयार ! सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टिका
SHARES

“ महाराष्ट्रात घोडेबाजारास सुरुवात झाली नसली तरी त्या दिशेने पावले पडू लागली आहेत. राष्ट्रपती राजवटीची शिफारस हा त्यातलाच एक प्रकार. आम्ही नाही तर कुणीच नाही हा जो एक अहंकाराचा दर्प निकालानंतर दरवळू लागला आहे तो काही राज्याच्या हिताचा नाही.”अशी नाराजी शिवसेनेचे मुखपत्र सामानातून भाजपला पून्हा एकदा लक्ष करण्यात आले आहे.


शिवसेनेच्या मुखपत्रातून वेळोवेळी भाजपवर टिका करण्यात आली. राष्ट्रवादीला बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेल्या मुदतीच्या आधीच राज्यपालांनी राष्ट्रपची राजवट लागू केल्यामुळे एकच वादंग निर्माण झालं. त्या शिवसेनेने ही सूर मिसळत बहुमतचा आकडा सिद्ध करण्यासाठी राज्यपालांकडून वेळ कमी मिळाला. याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.याबाबत शिवसेनेच्या मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामनातून भाजपवर जोरदार टिका करण्यात आली आहे. “महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या आदेशाचे पालन होत नाही व हा जनादेशाचा अपमान आहे. वगैरे तत्त्ववादी विचार मांडणाऱ्यांनी एक समजून घेतले पाहिजे की, हा जो काही जनादेश मिळाला आहे तो 'दोघांना' मिळाला आहे. दोघांनी मिळून ज्या भूमिकांवर शिक्कामोर्तब केले त्यास हा जनादेश मिळाला आहे. मात्र ते मानायला तयार नव्हते म्हणूनच महाराष्ट्राच्या मातीचा स्वाभिमान राखण्यासाठी आम्हाला स्वतंत्र पावले उचलावी लागली. याचा दोष कोणी आम्हाला का द्यावा? भारतीय जनता पक्ष हा तत्त्वाचा, नीतिमत्तेचा, संस्काराने वागणारा पक्ष आहे असे म्हणतात, पण महाराष्ट्राच्या बाबतीत ही तत्त्वे आणि संस्कार त्यांनी पाळायलाच हवे होते. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात सत्ता स्थापन होऊ द्यायची नाही व राजभवनाच्या झाडाखाली बसून पत्ते पिसत बसायचे हा सर्व खेळ महाराष्ट्राची जनता पाहत आहे. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीबरोबर नक्की काय करायचेते आम्ही पाहू. भाजपबरोबर अमृताच्या पेल्यातील विषाचा घोट आम्ही रिचवल्यावर आता महाराष्ट्रातील अस्थिरता संपविण्यासाठी 'नीळकंठ' व्हायला आम्ही तयार आहोत. अगदी हिंदुत्वाच्याच भाषेत समजावून सांगायचे तर ज्या भगवान शंकराने 'हलाहल' प्राशन केले त्याच शिवाची भक्ती शिवरायांनी केली व शिवरायांची पूजा शिवसेनेने केली.” अशी जहरी टिका सामानाच्या अग्रलेखातून राष्ट्रीपती राजवट आणि सत्ता स्थापनेवरून भाजपवर  करण्यात आली आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा