Advertisement

महाशिवआघाडीचा फाॅर्म्युला ठरला? 'असं' होईल सत्तेचं वाटप

अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदासह सत्तेतील समान वाटपावरून भाजप-शिवसेनेत फाटाफूट झाली होती. पण याच फाॅर्म्युल्यावर शिवसेना, ​काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं​​​ एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महाशिवआघाडीचा फाॅर्म्युला ठरला? 'असं' होईल सत्तेचं वाटप
SHARES

अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदासह सत्तेतील समान वाटपावरून भाजप-शिवसेनेत फाटाफूट झाली होती. पण याच फाॅर्म्युल्यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मंगळवारी रात्री उशीरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची ट्रायडंट हाॅटेलमध्ये भेट घेतली. या भेटीतच संभाव्य आघाडीतील सत्ता वाटपावर चर्चा झाल्याचं समजत आहे. त्यानंतर उद्धव यांनी काँग्रेस नेत्यांसोबत किमान समान कार्यक्रमावरही चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा- 'आरेचा शाप' देवेंद्र फडणवीसांना भोवला, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

 
काय आहे फाॅर्म्युला?

  • या फाॅर्म्युल्यानुसार महाशिवआघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद तर काँग्रेसला ५ वर्षांसाठी उपमुख्यमंत्रीपद
  • प्रत्येक पक्षाला १४ मंत्रीपद 
  • त्याचप्रमाणे राज्यातील सर्व महामंडळं आणि समित्यांचं समसमान वाटप करण्यात येईल
  • कोणत्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी बसवायचं याचे सर्वाधिकार संबंधित पक्षाला 
  • ठाकरे कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसण्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून कुठलाही आक्षेप नाही

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.


हेही वाचा-

'नीळकंठ' व्हायला आम्ही तयार ! सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका

..तेव्हाच शिवसेनेसोबत चर्चा, काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा