'आरेचा शाप' देवेंद्र फडणवीसांना भोवला, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

देवेंद्र फडणवीस सरकार पायउतार झाल्यावर ट्विटरवर #AareyKaShraap ट्रेंड होत आहे.

SHARE

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १९ दिवस झाले तरी  अद्याप सरकार स्थापन झाले नाही. राज्यपालांनी  भाजप पाठोपाठ शिवसेना आणि राष्ट्रवादीला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिलं. मात्र, नवीन सरकार नसल्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर त्यांना आरेचा शाप लागला असं म्हणत नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरूवात केली. ट्विटरवर #AareyKaShraap ट्रेंड होत आहे. 

नेटकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांना आरेमधील झाडे तोडण्याच्या त्याच्यां निर्णयाची आठवण करुन दिली. यासोबतच ट्विटरवरुन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेल्या भाजपा सरकारवरही जोरदार निशाणा साधण्यात आला. ट्विटरवर लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना आरे का मारेकरी असंही म्हटलं.हेही वाचा -

राज्यपालांनी पुरेसा वेळच दिला नाही, शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका

काँग्रेसलाही मिळावी सत्तास्थापनेची संधी, नाहीतर पक्षपातीपणा - पृथ्वीराज चव्हाण
संबंधित विषय
ताज्या बातम्या