काँग्रेसलाही मिळावी सत्तास्थापनेची संधी, नाहीतर पक्षपातीपणा - पृथ्वीराज चव्हाण

काँग्रेसला देखील राज्यपालांनी संधी दिली पाहिजे, नाहीतर हा अन्याय ठरेल, अशी अपेक्षा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

SHARE

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं, त्याच पद्धतीने काँग्रेसला देखील राज्यपालांनी संधी दिली पाहिजे, नाहीतर हा अन्याय ठरेल, अशी अपेक्षा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. 

हेही वाचा- Live Updates- महाराष्ट्रात पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश

सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, राज्यपालांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या नियमानुसार सत्ता स्थापनेचा दावा करण्याचं निमंत्रण दिलं. मात्र पुरेसं संख्याबळ नसल्याचं सांगत हा दावा करण्यास भाजपने नकार दिला. त्यानंतरच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणं अपेक्षित होतं. परंतु नियम नसतानाही राज्यपालांनी स्वत:च्या अधिकारांतर्गत दुसऱ्या क्रमांकाच्या शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी निमंत्रण दिलं. 

हेही वाचा- दिरंगाई नडणार? काँग्रेस-राष्ट्रवादीतील मतभेद चव्हाट्यावर

परंतु शिवसेना दिलेल्या मुदतीत सत्ता स्थापनेचा दावा करताना संख्याबळ दाखवता न आल्याने त्यांनी संधी दवडली. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी निमंत्रण दिलं. भाजपला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांनी ७२ तासांची मुदत दिली होती. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला फक्त २४ तासांचीच मुदत देण्यात आली. राष्ट्रवादी जर सत्तास्थापनेचा दावा करण्यात अपयशी ठरली. तर काँग्रेसला देखील राज्यपालांनी निमंत्रण दिलं पाहिजे. तसं न केल्यास हा सरळसरळ पक्षपातीपणा ठरेल, असं देखील चव्हाण म्हणाले.हेही वाचा- 

पवारांची लिलावतीत संजय राऊतांशी गुप्तगू

राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचं निमंत्रण, पण संख्याबळाचं काय?संबंधित विषय
ताज्या बातम्या