Advertisement

पवारांची लिलावतीत संजय राऊतांशी गुप्तगू

सत्तास्थापनेच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांच्या आज महत्त्वाच्या बैठका होत आहे.

पवारांची लिलावतीत संजय राऊतांशी गुप्तगू
SHARES

गेल्या १५ दिवसांपासून सत्तास्थापनेसाठी बहुमताचा आकडा मिळवण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमकपणे शिवसेनेची भूमिका मांडत आहे. मात्र सोमवारी संध्याकाळी छातीत वेदना होत असल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी लिलावती रुग्णालयात गेले होते. त्याचवेळी काही मिनिटांसाठी पवार आणि राऊतांच्यात एकांतात चर्चा झाली. त्यामुळे सत्तास्थापनेबाबत अद्याप ही शिवसेना सत्तास्थापनेच्या स्पर्धेत असल्याचे बोलले जाते.

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. सोमवारी शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा फोल ठरला. यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. सत्तास्थापनेच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांच्या आज महत्त्वाच्या बैठका होत आहे. दरम्यान शरद पवार यांनी शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांची लिलावती रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. त्यावेळी पवार आणि राऊतांमध्ये काही वेळेसाठी एकातांत चर्चा झाली. शिवसेनेला बहुमताचा आकडा मिळवण्यात उशिर झाल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तास्थापनेसाठी बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ दिली आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचा चेंडू आता राष्ट्रवादीच्या गोटात असून पवार आता कसे बहुमत सिद्ध करतात. याकडे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा