डिस्चार्ज मिळताच संजय राऊतांची तोफ धडाडली, पहिला निशाणा भाजप-राज्यपालांवर

मागील दोन दिवसांपासून वांद्र्यातील लिलावती रुग्णालयात उपचार घेत असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांना बुधवारी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून घरी जाताना माध्यमांशी साधलेल्या संवादात भाजप आणि राज्यपालांवर कडक शब्दांत टीका केली.

SHARE

मागील दोन दिवसांपासून वांद्र्यातील लिलावती रुग्णालयात उपचार घेत असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांना बुधवारी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून घरी जाताना माध्यमांशी साधलेल्या संवादात भाजप आणि राज्यपालांवर कडक शब्दांत टीका केली.

हेही वाचा- महाशिवआघाडीचा फाॅर्म्युला ठरला? 'असं' होईल सत्तेचं वाटप

काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच सोमवारी दुपारी राऊत यांच्या छातीत दुखू लागलं. त्यानंतर त्यांना तात्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या रक्तवाहिनीत २ ब्लाॅकेज आढळल्याने त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यानंतर राऊत यांचा मुक्काम २ दिवस रुग्णालातच होता. बुधवारी दुपारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की,

भाजपने दिलेला शब्द न पाळल्याने महायुतीत फाटाफूट झाली. राज्यपालांनी आम्हाला सत्तास्थापनेसाठी पुरेसा वेळ दिला नाही. भाजपला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घाई झाली होती. काहीही झालं तरी शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही आजही ठाम आहोत. काँग्रेस-राष्ट्रवादीची विचारधारा जरी वेगळी असली, तरी महाराष्ट्राच्या भल्यासाठी त्यांच्यासोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करणं काही गैर नाही. राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असं म्हटलं जात असलं, तरी ही निव्वळ अफवा असून अशा अफवा पसरवणं बंद करा, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली. 


हेही वाचा-

राष्ट्रपती राजवटीचा पहिला झटका शिवसेनेलाच

मध्यावधी निवडणुकीची शक्यताच नाही, शरद पवार यांनी दिला आमदारांना विश्वास संबंधित विषय
ताज्या बातम्या