Advertisement

राष्ट्रपती राजवटीचा पहिला झटका शिवसेनेलाच

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाठिंब्याचे पत्र न मिळाल्याने शिवसेनादेखील सत्ता स्थापन करू शकली नाही.

राष्ट्रपती राजवटीचा पहिला झटका शिवसेनेलाच
SHARES

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सर्वच प्रशासकिय विभाग कामाला लागले आहेत. या राष्ट्रपती राजवटीचा पहिला फटका शिवसेनेलाच बसल्याचे पहायला मिळत आहे. सध्या सुरू असलेल्या राजकारणावरून शिवसेनेकडून मातोश्रीबाहेर मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावली होती. त्यावर महापालिकेने बुधवारी कारवाईचा बडगा उगारला.

सध्याच्या राजकिय घडामोडींना अनुसरून शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर 'आपला आमदार आपला मुख्यमंत्री' असे लिहिले होर्डिंग्ज लावले होते. या बॅनरच्या चर्चा सर्वत्र होत्या. मात्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्याने  आता हे फलक पालिकेने काढून टाकले आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर ही कारवाई केल्याचे दिसत आहे. भाजपने सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यानंतर शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी विचारणा करण्यात आली. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाठिंब्याचे पत्र न मिळाल्याने शिवसेनादेखील सत्ता स्थापन करू शकली नाही. मात्र, त्यांनी राज्यपालांना वेळ वाढवून मागितला होता. त्यांनी तो वेळ नाकारला. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीला विचारणा केली. मात्र, राष्ट्रवादीने देखील अवधी मागितला होता. राज्यपालांनी त्यांना देखील वेळ वाढवून देण्यास नकार दिला. त्यामुळे राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यानंतर आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.

संबंधित विषय
Advertisement