Advertisement

फडणवीस ज्योतिषशास्त्राचे विद्यार्थी आहेत काय? शरद पवारांचा टोला

फडणवीस ज्योतिषशास्त्राचे विद्यार्थी असल्याचं मला माहीत नव्हतं, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला हाणला आहे.

फडणवीस ज्योतिषशास्त्राचे विद्यार्थी आहेत काय? शरद पवारांचा टोला
SHARES

राज्यात ३ पक्षाचं सरकार चालू शकत नाही, त्यामुळे पुन्हा एकदा भाजपचंच सरकार येणार, असं म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी भाजप पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केलं. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस ज्योतिषशास्त्राचे विद्यार्थी असल्याचं मला माहीत नव्हतं, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला हाणला आहे. 

हेही वाचा- भाजपाशिवाय कोणाचेही सरकार येणार नाही - देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांच्या पिकांचं पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार नागपूरच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. राज्यात पुन्हा भाजपचं सरकार येईल, असं भाजपचे नेते म्हणत आहे, याविषयी काय वाटतं? असं पवार यांना पत्रकारांनी विचारला.

त्यावर बोलताना पवार म्हणाले, सध्या तरी मी पुन्हा येईल, एवढंच माझ्या डोक्यात आहे. मी फडणवीसांना मागील काही वर्षांपासून ओळखतं आहे. पण ते ज्योतिषशास्त्राचे विद्यार्थी असल्याचं मला आताचं कळलं. 

हेही वाचा- काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे संजय राऊतांकडून तोंड भरून कौतुक

सत्ता स्थापनेच्या पेचावर त्यांनी सांगितलं की, राज्यातील जनतेने एखाद्या पक्षाला बहुमत दिलं असतं, तरी वेळ आली नसती. राज्यात स्थिर सरकार यावं आणि ते ५ वर्षे चालावं, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे किमान समान कार्यक्रमावर चर्चा करण्यात येत आहे. सत्ता वाटपाच्या सूत्रावरील चर्चाही प्राथमिक टप्प्यात आहे. हे सूत्र अंतिम झाल्यास सर्वांना कळवण्यात येईल. हेही वाचा-
महाशिवआघाडीचा मसुदा तयार? सत्ता स्थापनेच्या दिशेने एक पाऊल पुढे...

सत्तापेच रविवारी सुटणार? पवार-सोनिया यांची रविवारी दिल्लीत भेटीची शक्यताRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा