Advertisement

सत्तापेच रविवारी सुटणार? पवार-सोनिया यांची रविवारी दिल्लीत भेटीची शक्यता

काँग्रेस आणि ​राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये​​​ सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. किमान समान कार्यक्रमावर दोन्ही पक्षांची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे.

सत्तापेच रविवारी सुटणार? पवार-सोनिया यांची रविवारी दिल्लीत भेटीची शक्यता
SHARES

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. किमान समान कार्यक्रमावर दोन्ही पक्षांची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे. या कार्यक्रमाचा मसुदा ठरल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची रविवारी दिल्लीत भेट घेणार असल्याचं समजत आहे.

 हेही वाचा- बंडखाेरीचा प्रयत्न करेल, त्याचं डोकं फुटेल, असं कुणाला म्हणाले दिलीप लांडे?

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापन करण्याआधी तिन्ही पक्षांमध्ये ध्येयधोरणांच्या बाबतीत एकवाक्यता हवी म्हणून किमान समान कार्यक्रमावर बोलणी करण्यात येत आहे. यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठकही झाली. दोन्ही काँग्रेसने किमान समान कार्यक्रमाचा मसुदा ठरवल्यानंतर त्या मसुद्यावर शिवसेनेसोबत चर्चा करण्यात येईल. शिवसेनेच्या अपेक्षेनुसार त्यात काही गोष्टींचा समावेश करण्यात येईल. त्यानंतरच सत्तेतील पदांच्या वाटपाच्या सूत्रांवर चर्चा करण्यात येईल. 

 हेही वाचा- राष्ट्रवादीचे ९ आमदार संपर्कात, भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा दावा

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रविवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी सत्ता स्थापनेच्या विषयावर चर्चा करतील. त्यानंतरच राज्यात महाशिवआघाडीच्या सत्ता स्थापनेची घोषणा केली जाईल, असं सूत्रांनी सांगितलं. 


हेही वाचा-
उद्धव ठाकरे -अहमद पटेल यांची बैठक झालीच नाही; अफवा पसरवणं बंद करा - संजय राऊत

मध्यावधी निवडणुकीची शक्यताच नाही, शरद पवार यांनी दिला आमदारांना विश्वास



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा